नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलींक) संदर्भात तोडगा काढण्यासाठी बैठक संपन्न
नाशिक शहर बससेवेसाठी स्थापन केलेल्या नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलीक) कंपनीने तिकीट वसुलीसाठी मॅक्स डिटेक्टीव्ह अॅन्ड सिक्युरीटी सर्व्हिसेस कंपनीची नियुक्ती केलेली आहे. सदर कंपनीने शहर बससेवेसाठी नेमणूक केलेल्या वाहकांनी दि. १८ जुलै २०२३ पासुन संप पुकारलेला होता. कर्मचा- यांच्या मुख्य मागण्यांमध्ये प्रलंबीत वेतन मिळणे, दंडात्मक कार्यवाहीबाबत फेरविचार करणे इत्यादींचा समावेश होता. संपाबाबत तोडगा काढणेसाठी आयुक्त तथा प्रशासक, मनपा तथा अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिटीलीक यांचे दालनात आज बुधवार दि. १९ जुलै २०२३ रोजी बैठक झाली.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी सिटीलीक व इतर अधिकारी, मॅक्स डिटेक्टीव्ह अॅन्ड सिक्युरीटी सर्व्हिसेस कंपनीचे प्रतिनिधी तसेच संप पुकारलेल्या वाहक कर्मचा-यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.बैठकीत वाहकांचे प्रलंबीत असलेले मे महिन्याचे वेतन मॅक्स डिटेक्टीव्ह अॅन्ड सिक्युरीटी सर्व्हिसेस कंपनीने दि.२१ जुलै, २०२३ पर्यंत अदा करणेबाबत निर्देश दिले. वाहकांना लागलेला उशीरा गेलेल्या फे-यांच्या दंडाबाबत फेरतपासणी करण्याबाबत सुचना देण्यात आल्या.
या बैठकीत दि. १९ जुलै दुपारपासुन बससेवा तात्काळ सुरु करण्याबाबत एकत्रित निर्णय झाला.
ही बैठक आयुक्त तथा प्रशासक, भाग्यश्री बानायत (भा.प्र.से.), यांचे अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी, सिटीलिंक प्रदिप चौधरी, मुख्य महाव्यवस्थापक श्री. बाजीराव माळी, महाव्यवस्थापक, मिलींद बंड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, प्रिती खारतुडे, मॅक्स डिटेक्टीव्ह अॅन्ड सिक्युरीटी सर्व्हिसेस कंपनीचे व वाहकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Comments
Post a Comment