दुगारवाडी धबधबा येथून युवक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना

त्रंबकेश्वर : त्रंबकेश्वर दुगारवाडी धबधबा परिसरात  रविवार विकेंड सुट्टीच्या निमित्ताने आलेल्या पर्यटकांमधून एक जण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. काल दुपारी उशिरा ही घटना घडली असून वन विभागासह पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वरसह परिसरात दमदार पाऊस नसला तरी सातत्याने रिमझिम पाऊस सुरूच आहे. त्यामुळे धबधबे वाहू लागलेले आहेत.
त्र्यंबकेश्वर जवळील दुगारवाडी धबधबा देखील ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

शनिवार-रविवारी वीकेंडला मोठ्या प्रमाणावर नाशिकसह राज्यभरातील पर्यटक दुगारवाडी धबधब्याला भेट देत असतात. अनुचित प्रकार घडू नये, म्हणून शनिवारीच  पोलिसांकडून येथील पर्यटकांना सूचना करण्यात आल्या होत्या, मात्र रविवारी पर्यटकांची गर्दी होऊन दुपारी चार वाजेच्या सुमारास नदीचे पाणी वाढल्याने नाशिक येथील सतरा वर्षीय पर्यटक वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
त्र्यंबकेश्वर जवळील काचूर्ली परिसरात दुगारवाडी धबधबा येथे काल दुपारी 4 वाजेच्या दरम्यान नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील 17 वर्षीय अमित शर्मा हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. संध्याकाळी 7.30 पर्यंत शोध घेण्यात आला पण सापडून आला नाही. शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला