पोस्ट्स

निराधार महिलांसाठी ‘शक्ती सदन’चा आधार

इमेज
महाराष्ट्र कल्याणकारी राज्य म्हणून ओळखले जाते. महिला सक्षमीकरण, सबलीकरणात आपले राज्य देशात अव्वल आहे. महिलांना शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्रात शासनाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहात महिला नेतृत्वक्षम व्हाव्यात यासाठी देखील विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या योजनांच्या माध्यमातून आपल्या राज्यातील महिलांचे शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे. महिला सक्षमीकरणाचा समृद्ध वारसा आपल्या राज्याला आहे. हा वारसा राज्य शासन पुढे नेत असून महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबवित आहे, त्यापैकी एक म्हणजे ‘शक्ती सदन योजना’ आहे. या योजनेमुळे निराधार महिलांना राज्यशासनाने ‘शक्ती सदन’चा आधार दिला असल्याची भावना महिलांमध्ये आहे. या योजनेमुळे निराधार महिलांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होत असून शासनाची ही योजना निराधारांचे जीवनमान उंचावत आहे. शक्ती सदन योजना राज्यातील निराधार, निराश्रित, नैसर्गिक आपत्तीत, कौटुंबिक हिंसाचारामध्ये बेघर झालेल्या महिला व त्यांच्या बालकांना अन्न, वस्त्र, निवारा व...

आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
यवतमाळ येथे ३३५ कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन यवतमाळ दि.१३ :- आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या असून, त्यासाठी देशात १ लक्ष कोटी रू. निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घरे, रस्ते, वीज, पाणी, वसतिगृह व रोजगार अशा सुविधांसाठी योजना-उपक्रम राबविण्यात येत असून, पुढील ३ वर्षांत आदिवासींच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे एकूण ३३५ कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके,खासदार संजय देशमुख,आमदार राजू तोडसाम, आमदार किसनराव वानखेडे, सईताई डहाके, संजय डेरकर, श्याम कोडे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी विकास मीना ...

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दहेगाव येथील ५ एमव्हीए क्षमतेच्या नवीन ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राचे भुमीपूजन

इमेज
शेतकरी व ग्राहकांना अखंड व मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार मंत्री छगन भुजबळ नाशिक दि.12 :-शेतकरी बांधवांना शेती सिंचनासाठी आवश्यक असलेल्या वीजेची गरज ओळखून शासनाकडून महावितरणच्या माध्यमातून नवीन विद्युत उपकेंद्र उभारण्यात येत आहेत. या विद्युत उपकेंद्रांच्या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांनाअखंड  व मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.निफाड तालुक्यातील वाहेगांव भरवस येथे मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजनेतून रुपये ३७१.४१ लक्ष निधीतून  ५ एमव्हीए क्षमतेच्या नवीन ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राचे भुमीपूजन  मंत्री श्री भुजबळ यांच्या हस्ते झाले.यावेळी प्रांतअधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडी, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, महावितरणचे कार्यकारी अभियंता वाय.पी.निकम, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर,लासलगाव बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप,संचालक डॉ.श्रीकांत आवारे,पांडुरंग राऊत, सरपंच सचिन दरेकर,सरपंच भगवान तिपायले,बाल...

कुंभार समाज समितीच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थिती सुशिलाबाई बोरसे यांचा सन्मान

इमेज
(प्रतिनीधी विजय चव्हाण) नाशिक दि.५:- जिल्हा कुंभार समाज विकास समितीतर्फे विद्यार्थी गुणगौरव,संतभूषण,आदर्श माता-पिता पुरस्कार सत्कार सोहळा प्रसंगी संत सेवा पुरस्काराने दिंडोरी येथील प्रगतशील शेतकरी वीट उत्पादक वै.गणपतराव बोरसे,यांच्या पत्नी बहादुरी येथील कै.नामदेव वैद्य,यांच्या कन्या गं.भा.सुशीलाताई गणपत बोरसे,यांचा सन्मान समितीच्या वतीने रमाकांत शिरसागर,महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झीरवाळ, भारती पवार,मा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री,सोमनाथ सोनवणे जिल्हा अध्यक्ष,यांच्या उपस्थितीत संत सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.सुशिलाताई यांचे अभिनंदन संत गोरोबा काका कुंभार समाज, हभप अंबादास गारे,अशोक महाराज,चेतन महाराज,माणिक रसाळ,खैरनार साहेब,ज्ञानेश्वर भागवत, नाशिक जिल्हा वीट उत्पादक आघाडी अध्यक्ष विजय चव्हाण अभोणा,युवा जिल्हाध्यक्ष निलेश राऊत नाशिक,सुमन बोरसे,छाया बोरसे,रंभाताई बोरसे, वैशाली चव्हाण, तसेच सर्व भजनी मंडळ, सर्व महिला मंडळ ,सर्व युवक मंडळ, सरपंच व ग्रामस्थ दिंडोरी यां सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्...

परमपूज्य फरशीवाले बाबांना राष्ट्रीय गौरव सन्मान प्रदान

नाशिक जिल्ह्याचा राष्ट्रीय पातळीवर उंचावला सन्मान द पर्यावरण, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाची दखल घेत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील परमपूज्य महामंडलेश्वर सद्गुरु (रघुनाथ जाधव) देवबाप्पाजी माऊली फरशीवाले बाबा यांना "राम दयाळू सिंह"राष्ट्रीय गौरव सन्मान २०२५" प्रदान करण्यात आला.पर्यावरण योग व सामाजिक सुरक्षा संस्था, दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा सन्मान दिल्ली सरकारचे कॅबिनेट मंत्री कपिल मिश्रा यांच्या हस्ते इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.कार्यक्रमास सेक्रेटरी, डायरेक्टर, न्यायमूर्ती तसेच केंद्र व राज्य शासनातील विविध उच्चपदस्थ अधिकारी यावेळी उपस्थित होते.सन्मानप्रदान सोहळ्यात संस्थेचे चेअरमन व्ही.पी.सिंह,यांनी याप्रसंगी फरशीवाले बाबांच्या निस्वार्थ कार्याचा लेखाजोखा सादर करत, त्यांच्या पर्यावरण रक्षण, सामाजिक आणि अध्यात्मिक सेवेचे विशेष कौतुक केले.या गौरवप्रसंगी स्वामी सच्चिदानंद,विश्व स्वरुपानंद महाराज,आशुतोष देशपांडे,आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.परमपूज्य फरशीवाले बाबांना मिळालेला हा राष्...

नागरीकाभिमुख सेवा गरजुंपर्यंत पोहोचवा - तहसीलदार कैलास चावडे

बागलाण :- पंचायत समिति बागलाण येथे अनुलोम मित्रांची शासकीय अधिकारीं सोबत योजना परीचय कार्यशाळा संपन्न बागलाण भागांतर्गत "अनुलोम मित्र योजना प्रशिक्षण कार्यशाळा व शासकीय अधिकारी परीचय" हा विषेश कार्यक्रम पंचायत समिती सभागृह सटाणा येथे संपन्न झाला.शासनाच्या विविध योजनांची माहिती व नागरीकाभिमुख सेवा कशा पद्धतीने तळागळात पोहचवता येतील यावर कार्यक्रमात भर देण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागलाण चे तहसीलदार कैलास चावडे,हे यावेळी उपस्थित होते.चावडे यांनी शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेउन नागरीकाभिमुक सेवा व शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोच करण्याचे आवाहन यावेळी तहसीलदार कैलास चावडे, यांनी केले. तसेच पंचायत समिती गावाचा केंद्र बिंदु असुन यामध्ये शासनाच्या अनेक योजनांचे वेग-वेगळे विभाग असुन या विभागांच्या योजना गरजु लाभार्थीन पर्यंत पोहोचवा,तसेच सर्व योजनांची यादी तयार करून गावा-गावात पोहोच केली जाईल, यासाठी अनुलोम मित्र यांनी गावा-गावात जनतेला मार्गदर्शन करावे,असे आवाहन सहायक गटविकास अधिकारी भैय्या सांवत,यांनी केले. तसेच नरेंद्र महाले (तालुका कृषिविभाग) शिंदे (कृषी विभ...

मविप्र जनसंपर्क अधिकारी रवींद्र आखाडे यांना पितृशोक

इमेज
नाशिक पंचवटी :- मखमलाबाद रोड येथील रहिवासी ज्ञानदेव भिकाजी आखाडे (६७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सनदी अधिकारी संजय आखाडे, मविप्र संस्थेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र आखाडे व सेतू केंद्राचे संचालक जितेंद्र आखाडे यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, मुलगी, जावई, चार भाऊ, दोन बहिणी, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. कैलासवासी ज्ञानदेव भिकाजी आखाडे, यांचा दशक्रिया विधी मंगळवार दि.१६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता रामकुंड, पंचवटी,नाशिक येथे आहे.गंधमुक्तीचा कार्यक्रम खांदवे सभागृह,कपालेश्वर मंदिराच्या मागे पंचवटी नाशिक.