पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे शानदार उद्घाटन

इमेज
मराठी भाषा जागतिक पातळीवर नेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार -मुख्यमंत्री  कविवर्य कुसुमाग्रज नगरीत मराठीचा देखणा सोहळा नाशिक दि. २७ :- कृत्रिम बुद्धिमत्ता एआयमुळे अनेक आव्हानांसोबत निर्माण झालेल्या संधींचा वापर करून जागतिक पातळीवर मराठी साहित्य नेण्याचे कार्य मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून करण्यात येईल.नव्या पिढीत मराठीतील संवाद कौशल्य विकसीत करण्यासाठी भाषेची प्रयोगशाळा (लँग्वेज लॅब) कार्यान्वित करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, संमेलनाचे निमंत्रक तथा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत,महापौर हिमगौरी आहेर- आडके, खासदार डॉ.शोभा बच्छाव,खासदार राजाभाऊ वाजे,विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम,भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,विश्व मराठी संमेलनासाठी अमेरिका,जर...

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण गतीसह गुणवत्तने विकासकामे पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य महानगरपालिकेद्वारे विहित मुदतीच्या आत पुलाचे काम पूर्ण मुंबई, दि. २६ : विकासकामांची गुणवत्ता राखत कामे गतीने पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. त्याच पद्धतीने बृन्हमुंबई महानगरपालिकेने गती आणि गुणवत्तेसह विहीत मुदतीच्या चार महिने आधीच मुंबई सेंट्रल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम केवळ 15 महिन्यात पूर्ण केले आहे,ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बृन्हमुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या कामाच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. लोकार्पण कार्यक्रमस्थळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभा...

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट - भरत कळसकर,परिवहन आयुक्त

इमेज
मुंबई,दि.२५ :- राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने राबविलेल्या सातत्यपूर्ण उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून जानेवारी २०२६ मध्ये अपघाती मृत्यूंमध्ये ८.०५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. जानेवारी २०२५ मध्ये १,४२७ अपघाती मृत्यू झाले होते, तर जानेवारी २०२६ मध्ये ही संख्या १,३१२ वर आली आहे.म्हणजेच ११५ मृत्यूंनी घट झाली आहे.त्याचप्रमाणे अपघातांची एकूण संख्या ३,१६४ वरून ३,१०० वर आली असून त्यात २ टक्क्यांची घट झाली आहे.रस्ता सुरक्षा उपायांमुळे अनेक जिल्ह्यांत मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे.नंदूरबार येथे ५० टक्के,सोलापूर शहर व वाशिम येथे प्रत्येकी ३६ टक्के,सिंधुदुर्ग येथे २९ टक्के,वर्धा येथे २८ टक्के,धाराशिव येथे २४ टक्के, गोंदिया व अमरावती ग्रामीण येथे प्रत्येकी २२ टक्के, तर नांदेड व नागपूर शहर येथे प्रत्येकी २१ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.राज्यातील अपघातांची संख्या सन २०३० पर्यंत ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून परिवहन विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.राज्य व जिल्हास्तरावर रस्ता सुरक्षा कक्ष स्थापन करण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यासाठ...

मुंबईत २७, २८ फेब्रुवारीला पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व व्यापार मेळावा - सभापती रवींद्र साठे

इमेज
ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन मुंबई, दि. 24 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच पीएम विश्वकर्मा योजनेच्या प्रसारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत 27 आणि 28 फेब्रुवारीला छोट्या उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व कारागिरांचे उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी हे प्रदर्शन असून नागरिकांनी वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे यांनी पत्रकार परिषदेत केले.रविंद्र साठे यांनी सांगितले की,केंद्र सरकारचे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय,यांचे कार्यालय,घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, साकीनाका, अंधेरी (पूर्व) येथे होणार आहे.हे प्रदर्शन आणि मेळावा सकाळी 10 ते संध्याकाळी 8 या वेळेत सर्वांसाठ...

संत नामदेव महाराज जागतिक पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान

इमेज
नागपूर :- गडकरी यांनी संत नामदेव महाराजांचा वारसा पुढे नेऊन लोकांची मने जिंकली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना संत नामदेव महाराजांचा वारसा आणि सामाजिक एकतेचा त्यांचा संदेश पुढे नेल्याबद्दल 'संत नामदेव महाराज जागतिक पुरस्कार'नागपूर येथे प्रदान करण्यात आला.नागपूर शहरातील रेशमबाग मैदानावर आयोजित 'राष्ट्रीय एकता जागतिक परिषदे'दरम्यान त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.यावेळी गडकरी म्हणाले की,संत नामदेव महाराजांनी समाजातून विषमता दूर करून एकतेचा मार्ग दाखवला.त्यांच्या विचारांच्या प्रभावा मुळेच त्यांच्या शिकवणी शीख धर्माच्या पवित्र ग्रंथ 'गुरु ग्रंथ साहिब'मध्ये समाविष्ट आहेत.गडकरी यांनी पंजाब मधील घुमान आणि महाराष्ट्रातील नरसी गावातील त्यांचे अनुभव सांगितले आणि संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज विठ्ठल महाराज,देवनाथ मठाचे प्रमुख जितेंद्रनाथ महाराज,सतपाल महाराज,प्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव आणि मुख्य समन्वयक ईश्वर धिरडे भानुमती गुजरणिया आदि उपस्थित होते.गडकरी यांनी पंजाब मधील घुमा...

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये ५०० यशस्वी शस्त्रक्रियांचा टप्पा पूर्ण

इमेज
नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी विभागाने ५०० यशस्वी इंटरव्हेन्शनल प्रक्रियांचा (IR Procedures) महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीचे श्रेय हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ.अमोल भालेकर, यांच्या कौशल्यपूर्ण कार्याला जाते.या निमित्ताने हॉस्पिटलतर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ही आधुनिक वैद्यकशास्त्रातील अत्याधुनिक शाखा असून,मोठी शस्त्रक्रिया न करता सूक्ष्म उपकरणांच्या सहाय्याने आणि इमेजिंग मार्गदर्शनाखाली (CT, Ultrasound, Angiography) उपचार केले जातात. त्यामुळे रुग्णांना कमी वेदना, कमी रक्तस्राव, कमी धोका आणि जलद पुनर्वसन याचा मोठा फायदा होतो.या ५०० प्रक्रियांमध्ये अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी, रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजवरील उपचार,ट्यूमर एम्बोलायझेशन, व्हेरिकोस वेन्स उपचार,बायोप्सी,ड्रेनेज प्रक्रिया, डायलिसिस कॅथेटर बसविणे,तसेच विविध अवयवांशी संबंधित गुंतागुंतीच्या मिनिमली इन्वेसिव्ह प्रक्रियांचा समावेश आहे.अत्याधुनिक उपकरणे,अचूक इमेजिंग तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित तज्ज्ञ टीम या...

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ‘आधारवड’ हरपला - मंत्री छगन भुजबळ

इमेज
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलतांना मंत्री छगन भुजबळ भावनिक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलतांना मंत्री छगन भुजबळ यांच्या कडून शोक व्यक्त मुंबई,दि.२३ फेब्रुवारी :- दादांच्या कामाची शिस्त, वक्तशीरपणा आणि सामान्यांच्या प्रश्नांची जाण हा सर्वांसाठी एक वस्तुपाठ होता.महाराष्ट्राच्या राजकारणातील एक‘आधारवड’आज उन्मळून पडला आहे. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही अशा शब्दात राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शोक भावना व्यक्त केल्या.राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आज सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व इतर दिवंगत व्यक्तींचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला.या शोकप्रस्तावावर मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,आज महाराष्ट्र विधानसभेत राज्याचे लाडके‘दादा’अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना मन अतिशय हेलावून गेले आहे.१९८५ पासून आजवर अनेक दिग्गजांना निरोप दिला,पण दादांसाठी शोकप्रस्ताव मांडावा...

दैनिक सनातन प्रभातचा वर्धापन दिनी साजरा

इमेज
वाचक,हितचिंतक यांच्या उपस्थितीत नाशिक येथे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापन सोहळ्यात हिंदुत्वाच्या चैतन्यमय शक्तीचा अविष्कार !  ‘व्रतस्थ धर्मरक्षक’ हे दोन शब्द दैनिक ‘सनातन प्रभात’च्या शीर्ष भागी दोन धर्म ध्वजांच्या मध्ये झळकते आहे ! - श्री. दुर्गेश परूळकर, व्याख्याते  नाशिक :- समाजाची धारणा,राष्ट्राचे स्थैर्य आणि स्वातंत्र्य हे केवळ राजसत्तेवर अवलंबून नाही,तर संस्कारांवर अवलंबून आहे.संस्कार विस्कळीत अथवा नाहीसे झाले,तर समाज भरकटत जाईल हे संतांनी ओळखले.त्यामुळे त्यांनी समाजात सुसंस्कारांचे बीज पेरले.त्याला उच्च नैतिकतेचे खतपाणी घातले.सांस्कृतिक अभंगता हे आपल्या देशाचे बळ आहे,सामर्थ्य आहे.ही अभंगता भंग करण्याचा प्रयत्न चालला आहे.तरी संस्कृती आणि धर्माच्या रक्षणाचा वसा घेतलेले व्रतस्थ धर्म रक्षकच राष्ट्राचे खरे वीर आहेत.त्यामुळे‘व्रतस्थ धर्मरक्षक’हे दोन शब्द दैनिक‘सनातन प्रभात’च्या शीर्ष भागी दोन धर्म ध्वजांच्या मध्ये झळकते आहे,असे गौरवोद्गार प्रसिद्ध व्याख्याते आणि हिंदुत्वनिष्ठ विचारवंत दुर्गेश परुळकर,यांनी यावेळी काढले.२२ फेब्रुवारीला शंकराचार्य न्यास संकुल,डॉ.कु...

गिर्यारोहणात सुरक्षितता सर्वात महत्त्वाची - राजेश गाडगीळ

इमेज
नाशिक :- गिर्यारोहणात सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे.अपघात कमी करण्या साठी जागरूकता आणि योग्य प्रशिक्षण खूप गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ गिर्यारोहक तज्ञ राजेश गाडगीळ,यांनी केले.सातपूर येथील नॅब सभागृहात नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्यूअर संस्थेला तांत्रिक साहित्य भेट देणाऱ्यांचा कृतज्ञता सोहळ्या प्रसंगी राजेश गाडगीळ,बोलत होते ते म्हणाले की गिर्यारोहकांना पर्वतांच्या भौगोलिक परिस्थिती,हवामान,आणि शारीरिक शक्ती याबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे.अर्धवट माहितीच्या जोरावर चुकीच्या आत्मविश्वासामुळे सध्या गिर्यारोहण क्षेत्रात अपघातांचे प्रमाण वाढले प्रमाण घटविण्यासाठी प्रत्येकाने जनजागृती करणे गरजेचे आहे.असे मार्गदर्शन केले.संस्थेला तांत्रिक साहित्य भेट देऊन सहकार्य केलेले प्रमुख अतिथी नंदू चव्हाण, भगवान चवले,भरत वखारिया,संजय अमृतकर आदींचा संस्थेच्या वतीने सन्मान करून कृतज्ञता व्यक्त  करून चर्चासत्रा प्रसंगी उपस्थितांच्या  शंकांचे निरसन करण्यात आले.याप्रसंगी उपस्थितितां मधील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता ऋतिक मारणे,याचा सत्कार करण्यात आला या चर्चासत्राचे सूत्रसंचालन तेज...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध सामंजस्य करार

इमेज
नवी दिल्ली, दि. २० :-  नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्वपूर्ण ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  या समिटमध्ये सहभागी होत ‘शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ याविषयावर संबोधन केले.तसेच विविध मान्यवरांच्या भेटी,बैठकांमध्ये सहभागी होत  सामंजस्य करार केले.याबरोबरच ‘कुंभदूत’ या ॲपचे अनावरण केले.   अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी! ओपन एआयचे पब्लिक पॉलिसी हेड ख्रिस लेहान आणि रॉकेट लर्निंगचे अझीज गुप्ता यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी ‘शिक्षासाथी’ या एआय आधारित टूलची घोषणा त्यांनी यावेळी केली. ओपन एआय आणि रॉकेट लर्निंगशी भागिदारी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. याचा लाखो अंगणवाडी सेविकांना लाभ होणार आहे. भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशनशी करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माहिती-तंत्रज्ञान विभाग आणि भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशन यांच्यात एआय आणि प्रशासकीय यंत्रणांचे डिजिटायझेशन यासंदर्भात करार करण्य...

कळवण मर्चंट बँकेच्या वतीने सभासदांना ट्रॅव्हल्स बॅग वाटप शुभारंभ

इमेज
कळवण :- कळवण तालुक्याची अर्थवाहिनी असलेली,प्रगतीची संजीवनी हे ब्रीद वाक्य घेऊन कार्यरत असणारी दि.कळवण मर्चंट बँके मार्फत सभासदांसाठी ट्रॅव्हल्स बॅग वाटपाचा शुभारंभ गुरुमाऊली आणासाहेब मोरे,यांच्या शुभहस्ते कळवण लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात संपन्न झाला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नाशिक लायन क्लब इंटरनॅशनल चे अध्यक्ष राजेश कोठावदे होते.प्रमुख अतिथी म्हणून मुकुंद कुलकर्णी,नाशिक, नामको बँकेचे चेअरमन हेमंत धात्रक,नामको बँकेचे संचालक अशोक सोनजे,गिरीश महाजन नाशिक महापालिका नगरसेवक भूषण राणे, महेश पितृभक्त,शाम महाजन,रमेश मालपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.कमको बँकेचे संचालक व नेते गजानन सोनजे,नेते संजय मालपुरे चेअरमन भारती कोठावदे,व्हा चेअरमन लक्ष्मण खैरनार, जनसंपर्क संचालक रंगनाथ देवघरे,प्रवीण संचेती योगेश महाजन,दिपक वेढणे,नितीन वालखेडे,सागर शिरोरे,शालिनी महाजन, सुभाष शिरोडे,धनंजय अमृतकर,विनोद मालपुरे,डॉ धर्मराज मुर्तडक,सतीश कोठावदे पोपट बहिरम, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य राजन मालपुरे,तज्ञ संचालक गलिब मिर्झा,भूषण कोटकर,शाखा व्यवस्थापक कैलास जाधव,व सर्व कर्मचारी आदींनी कार्यक...

गिरणा आरोप प्रकरणी उबाठा सेनेचे खा संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केली

इमेज
गिरणा साखर कारखान्यातील शेअर होल्डर्स, शेतकरी बांधव तसेच सर्व मालेगावच्या जनतेची संजय राऊत यांनी मागितली माफी.! मालेगाव :- दैनिक सामना मध्ये खा. संजय राऊत यांच्या माध्यमातून गिरणा साखर कारखान्याबाबत १७८ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता.या बातमीमुळे मालेगाव आणि पंचक्रोशीतील शेतकरी सभासदांमध्ये संभ्रम निर्माण झाला.याबाबत  आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की,हा आरोप पूर्णपणे निराधार व चुकीच्या माहितीतून करण्यात आला होता.एकेकाळी सहकारातून उभा राहिलेला गिरणा सहकारी साखर कारखाना विक्रीच्या प्रक्रियेत असताना,तो तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा या उद्देशाने सुमारे ११ हजार सभासद शेतकरी एकत्र आले होते.प्रति शेअर ११०० रुपये उभे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.सर्वपक्षीय लोकांनीही या प्रयत्नाला साथ दिली.काही कारणांमुळे अपेक्षित भागभांडवल पूर्णपणे उभे राहू शकले नाही; मात्र जेवढी १.७८ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली,ती अधिकृत पद्धतीने आरटीजीएसद्वारे कारखाना खरेदी करणाऱ्या कंपनीकडे वर्ग करण्यात आली.हा सर्व व्यवहार नोंदीनुसार आणि कायदेशीर मार्गाने झालेला होता.यावेळी स्पष्...

पांडवनगरी येथे छत्रपती शिवरायांची जयंती जल्लोषात साजरी

इमेज
नाशिक :- इंदिरानगर पांडव नगरी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थितांनी शिवप्रतिमेचे पुजन करत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला कार्यक्रमाचे आयोजन पोपट डावरे,सुनील गांगुर्डे,संजय राव,भगवान भदर्गे,गणेश पवार,जितेंद्र सावंत,भूषण जगताप,बाबा डोंगरे,पंढरी सूर्यवंशी,संजय गांगुर्डे,दिगंबर राठोड,योगेश सूर्यवंशी,विकी पगारे,मयूर गायकवाड,राहुल चव्हाण,प्रणव मोरे,यांनी केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र सचिव एकनाथ मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर सरचिटणीस योगेश दिवे,यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी कल्पना शिंदे,विमल गावंडे, विमल डावरे,विमल पवार,इंदुताई गांगुर्डे,शालिनी दिवे,कविता सैंदाणे,छाया ठाकूर,अनुष्का चव्हाण, योगिता शिरसाट,रसिका सावंत,सविता सूर्यवंशी, नामदेव जोगदंड,गजानन वानखडे,यशवंत शिरसाट,इत्यादी व नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकल मराठा परिवाराकडून वृक्षलागवड करून शिवजन्मोत्सव साजरा

इमेज
नाशिक :- पत्रकार सकल मराठा परिवाराच्या वतीने शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून आगळीवेगळी शिवजयंती मनपा शाळा क्रमांक ४९,पंचक. या ठिकाणी साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे गडकोट आणि निसर्गाचे जतन केले,त्याच प्रेरणेने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी,भविष्यातील पिढीने निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी,या उद्देशाने प्रत्येक रोप हे शिवप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक म्हणून लावण्यात आले.वृक्षारोपण हीच खरी शिवसेवा समाजहित आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही शिवजयंती खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरेल.या उपक्रमासाठी आपलेत पर्यावरण संस्थेचे शेखर गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.याप्रसंगी त्यांनी वृक्षारोपण कसे करावे याविषयी तसेच झाडांच्या विविध प्रजाती विषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.तसेच मोलाचे सहकार्य ऍड.सुनील आण्णा बोराडे,शालेय समिती अध्यक्ष,केंद्रप्रमुख गोपाल बैरागी सर,योगेश निसाळ,मुख्याध्यापिका विमल रायते,(ढिकले...

ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी दोन कोटी ७८ लाखांच्या मुद्देमालासह इसम ताब्यात

इमेज
नाशिक :- दिनांक २०/०२/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालखेड एमआयडीसी परिसरात असलेल्या एम.आय.टी.सी. रोलिंग मिल प्रा. लि. कंपनीच्या बाहेर पार्किंगमध्ये एक टोळी सक्रिय होती.स्टील (आसरी) वाहतूक करणाऱ्या ट्रेलरचे चालक एकमेकांशी संगनमत करून, अंधाराचा फायदा घेऊन एका ट्रेलरमधून दुसऱ्या ट्रेलरमध्ये स्टील काढून ते काळ्या बाजारात विक्री करण्याच्या तयारीत होते.माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार या ठिकाणी कारवाईसाठी रवाना झाले.एम.आय.टी.सी. रोलिंग मिल कंपनीच्या बाहेरील मोकळ्या जागेत छापा टाकून खालील इसमांना ताब्यात घेण्यात आले: ताब्यात घेतलेले आरोपी: १) अझरुद्दीन सादीक शेख (वय ३६, रा. नानावली, जुने नाशिक) २) अरुण गणपत खांदवे (वय ३८, रा. ऋषीदास सोसायटी,कलानगर, म्हसरूळ,नाशिक) ३) अमर घाडगे (रा.भराडवाडी, दिंडोरी, जि. नाशिक - फरार) ४) वकार सगीर अहमद (वय २५, रा. गोपालपूर, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश - चालक) ५) हरेंद्र बळीराम यादव (वय २७, रा. मिलनखुर्द, जि. संत कबीर...

व्‍होल्‍वो कार इंडिया आणि चार्जझोन यांच्‍याकडून इगतपुरीजवळ मुंबई-नाशिक महामार्गावर अल्‍ट्रा-फास्‍ट ईव्‍ही चार्जिंग स्‍टेशन लाँच

इमेज
ईगतपुरी :- ईगतपुरी मुंबई-नाशिक महामार्गावरील फूड हिल्‍स येथे स्थित ३६० केडब्‍ल्‍यू स्‍टार चार्ज पॉवर युनिटसह दोन डायनॅमिक लोड बॅलन्सिंग डिस्‍पेन्‍सर्स आहेत नाशिक,१९फेब्रुवारी स्वीडिश लक्‍झरी कार ब्रँड व्‍होल्‍वो कार इंडिया आणि भारतातील सर्वात मोठे ईव्‍ही चार्जिंग नेटवर्क चार्जझोन यांनी आज मुंबई-नाशिक महामार्गावर अल्‍ट्रा-फास्‍ट चार्जिंग स्‍टेशनचे उद्घाटन केले.या चार्जिंग स्‍टेशनमध्‍ये ३६० केडब्‍ल्‍यू स्‍टार चार्ज पॉवर युनिटसह दोन डायनॅमिक लोड बॅलन्सिंग डिस्‍पेन्‍सर्स आहेत.हे चार्जिंग स्‍टेशन इगतपुरीजवळ मुंबई-नाशिक महामार्गावरील फूड हिल्‍स येथे स्थित आहे.हे उद्घाटन देशभरात प्रीमियम सुपरचार्जिंग नेटवर्क उभारण्‍यासाठी त्‍यांच्‍या सहयोगामधील महत्त्वपूर्ण टप्‍पा आहे.हे इंटेलिजण्‍ट कॉन्फिग्‍युरेशन व्‍होल्‍वो ग्राहक आणि इतर ईव्‍ही वापरकर्त्‍यांना सानुकूल ऊर्जा वितरण,कमी प्रतिक्षा कालावधी व वास्‍तविक विश्वामध्‍ये जलद चार्जिंग अनुभव देते. महाराष्‍ट्रातील सर्वात वर्दळीच्‍या इंटरसिटी मार्गावर धोरणात्‍मकरित्‍या स्थित या चार्जिंग स्‍टेशनमध्‍ये व्‍होल्‍वो ईव्‍हींसाठी समर्पित बे आहेत. तसे...

काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक - मंत्री नितेश राणे

इमेज
केंद्र-राज्य समन्वयातून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्याची ग्वाही मुंबई,दि.१८ :- काजू प्रक्रिया उद्योग, निर्यातदार तसेच शेतकरी यांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी आवश्यक त्या निर्णयांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या ५ टक्के परतावा योजनेअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. काजू उद्योगाला आर्थिक बळकटी देत स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीत काजू निर्यात धोरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली.केंद्र व राज्य शासन यांच्यात प्रभावी समन्वय साधून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले.बैठकीस महाराष्ट्र काजू प्रक्रिया उद्योग (केसीओ) असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या निर्णयामुळे सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील काजू उद्योगाला चालना मिळून रोजगारनिर्मितीला वेग येईल,नि...

'ज्यापाशी आरमार, त्याचा समुद्र’: भारतीय नौदलाचे जनक शिवछत्रपती

इमेज
छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘ज्यापाशी आरमार, त्याचा समुद्र’ हे सूत्र ओळखून परकीय सत्तेला रोखण्यासाठी स्वदेशी आरमार, अभेद्य जलदुर्गांचे कवच उभारले. त्यांची हीच दूरदृष्टी आणि ‘आत्मनिर्भर’ विचारसरणी आजही भारताच्या सागरी सुरक्षेचा अभेद्य पाया आहे.छत्रपती शिवरायांच्या जयंती त्यानिमित्त या विषयावर थोडक्यात टाकलेला प्रकाश.सतराव्या शतकातील भारताची राजकीय स्थिती पाहिली,तर एका विचित्र विरोधाभासाचे दर्शन घडते.उत्तरेकडे मोगलांचे साम्राज्य शिखरावर होते.जमिनीवर त्यांची ताकद अफाट होती,पण समुद्राकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अत्यंत संकुचित होती.याउलट,भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषतः कोकणात परकीय सत्तांनी धुमाकूळ घातला होता.पोर्तुगीज, इंग्रज, डच आणि जंजिऱ्याचे सिद्दी यांनी अरबी समुद्रावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. परिस्थिती इतकी बिकट होती की,खुद्द मोगल बादशहालाही मक्केला यात्रेसाठी जायचे असेल, तर पोर्तुगीजांकडून ‘काटाझ’ (Cartaz) नावाचा परवाना घ्यावा लागत असे.हा परवाना नसेल,तर जहाजे बुडवली जात किंवा जप्त केली जात. भारतीय व्यापाऱ्यांची अवस्था तर त्याहून दयनीय होती.परकीय सत्तांच्या या ‘...

नागपूर येथे संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंम्मेलनाचे दि.२२ फेब्रुवारी रोजी आयोजन

इमेज
नाशिक :- समस्त शिंपी,दर्जी समाजाचे रविवार दि.२२ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे रेशिमबाग या ऐतिहासिक मैदानावर संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासम्मेलन होणार असून संपूर्ण भारतातील समस्त शिंपी समाजातील पोटजाती यानिमित्ताने एकत्र येत आहेत.या महासम्मेलनात राजस्थान येथील पद्मश्री रामकिशोरजी छीपा डेरावाला,गुजरातचे पद्मश्री कनुभाई टेलर,प्रवीणभाई दर्जी,आणि संत मंडळी,राजकीय प्रतिभावान समाजबंधू,भजनी मंडळे यांचा सहभाग होणार आहे.या कार्यक्रमाला देशपातळी वरील मान्यवर उपस्थित राहणार असून यावेळी संत नामदेव महाराज विश्वरत्न पुरस्काराने सड़क परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालय,भारत सरकार,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,यांना सन्मानित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान,केंद्रीय कृषि मंत्री प्रल्हाद जोशी,उपभोक्ता मामले,खाद्य आणि सार्वजनिक वितरण तथा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री,भारत सरकार खा.प्रणीती शिंदे, सरहद्द संस्था पुणे येथील अध्यक्ष संजय नहार,खा.अनिल बोंडे,संजय खोडके,आ.सुलभा खोडके,आ....

भंडाऱ्यात न्हाली गोदातीर ४६ वर्षांनंतर मऱ्हळच्या खंडोबाची गोदावरीशी भेट

इमेज
करंजी खुर्द येथे महाशिवरात्री उत्सव उत्साहात संपन्न  नाशिक :- श्रीमंत भुषण सिंह राजे होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,यांचे वंशज यांची सोहळ्यास उपस्थिती'यळकोट यळकोट जय मल्हार मार्तंड भैरवाचा' आणि 'सदानंदाचा येळकोट' अशा जयघोषात,प्रतिजेजुरी मऱ्हळ येथील खंडोबा महाराज पालखी तब्बल ४६ वर्षांनंतर गोदावरी नदीच्या भेटीसाठी करंजी खुर्द येथे दाखल झाली. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर झालेल्या या सोहळ्यासाठी करंजी खुर्द येथील ग्रामस्थ आणि तरुण मित्र मंडळांनी स्वयंसेवकांनी गर्दीचे नियोजन,पिण्याचे पाणी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सेवा केली या महाशिवरात्री यात्रोत्सवात भक्ती,परंपरा आणि दातृत्वाचा त्रिवेणी संगम पहावयास मिळाला.पालखी करंजी खुर्द सिन्नर तालुका व निफाड तालुका सरहद्दीवरुन डि.जे लावुन भंडाऱ्याची उधळण करत फट्याक्याची आतिष बाजी करत पालखीचे गोदावरी नदीच्या काठावर आगमन झाले यावेळी देवतांना गोदावरी नदी पात्रात स्नानासाठी विशेष व्यवस्था ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आली होती वाकद शिरवाड्याचे सरपंच डॉ.श्रीकांत आवारे सौ. मनीषा आवारे दाम्पत्याच्या हस्ते पालखीचे विधीवत...

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक येथे २०२५ वर्षात एक हजारांच्या वर यशस्वी ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया

इमेज
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथील ऑर्थोपेडिक विभागाने २०२५ या वर्षात तब्बल १००० यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण करत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.उल्लेखनीय कामगिरीनिमित्त हॉस्पिटलतर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यासर्व शस्त्रक्रिया ऑर्थोपेडिक सर्जन्स डॉ.सागर काकतकर,डॉ.जयेश सोनजे, डॉ.श्रीकांत जाधव आणि डॉ.राहुल सुपे यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ टीमचा मोलाचा वाटा आहे.त्यांच्या कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया,अचूक निदान,रुग्ण-केंद्रित दृष्टिकोन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हा टप्पा गाठणे शक्य झाले आहे.या १००० शस्त्रक्रियांमध्ये गुडघा व खुबा प्रत्यारोपण (Joint Replacement), लिगामेंट पुनर्बांधणी (Ligament Reconstruction), फ्रॅक्चर व्यवस्थापन, आर्थ्रोस्कोपी तसेच इतर जटिल हाड व सांध्यांच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.तसेच,अत्याधुनिक रोबोटिक सर्जरी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काही गुडघा व सांध्यांच्या शस्त्रक्रिया अधिक अचूकतेने पार पाडण्यात आल्या. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेतील नेमकेपणा वाढतो,इम्प्लांटचे अचूक पोझिशनिंग करता ...

राज्यव्यापी भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा नाशिकमध्ये संपन्न

इमेज
नामदेव शिंपी समाजाचा पुढाकार नाशिक :-  नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ,नाशिक यांच्या वतीने आयोजित २१ वा नामदेव शिंपी समाज उत्सव शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समाजबांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. महामार्ग बस स्थानकाजवळील तुपसाखरे लॉन्स येथील कै. श्री. संजीव विष्णुपंत तुपसाखरे सभागृहात हा सोहळा पार पडला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अतुल सुधाकर मानकर (अध्यक्ष, नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ) यांनी उपस्थितांचे स्वागत करत समाजातील ऐक्य आणि संघटनाबळ यावर भर दिला.महिला अध्यक्षा वृषाली संजीव तुपसाखरे,यांनी आपल्या मनोगतातून समाजातील महिलांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे राज्यव्यापी भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा होय. राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने पालक व युवक-युवतींनी सहभाग नोंदवला.या मेळाव्याच्या माध्यमातून सुयोग्य स्थळांची माहिती देवाण-घेवाण होऊन समाजातील वैवा...

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य - विजया रहाटकर

इमेज
‘इंडिया ‘एआय’ इम्पॅक्ट समिट’मध्ये महिला समृद्धीचा निर्धार नवी दिल्ली, दि. १६ :-  आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण,प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे.आगामी काळात ‘एआय’मुळे रोजगाराच्या संधी आणि स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलणार असून महिलांनी  या तंत्राच्या केवळ ‘वापरकर्त्या’ म्हणून न राहता संशोधक आणि  निर्माते होऊन नव्या परिवर्तनाचे नेतृत्व करावे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास होउ शकेल असा आशावाद राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज येथे व्यक्त केला.दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये  दुपारी राष्ट्रीय महिला आयोग, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आणि संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण व संशोधन संस्था (युनिटार) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘एआय’ आणि आर्थिक शक्ती – महिला नेतृत्वातील समृद्धीची रूपरेषा या  विषयावर आयोजित विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समारोपीय भाषणात त्या बोलत होत्या...

अन्न व औषध प्रशासन विभागातील लाच प्रकरणाची गंभीर दखल - मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आदेश

इमेज
मुंबई, दि. १५ :- अन्न व औषध प्रशासन विभागामधील लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लाच घेताना पकडलेल्या लिपिकाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.संबंधित लिपिकाची केवळ चौकशीच नव्हे,तर त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.विभागातील दक्षता पथकाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. लिपिक राजू ढेरिंगे याच्याविरुद्ध वस्तुनिष्ठ आणि सर्वंकष अहवाल तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले आहे.राजू ढेरिंगे हे मूळ अन्न व नागरी पुरवठा विभाग येथील कर्मचारी असून सध्या अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते.

मुलुंड मेट्रो दुर्घटना प्रकरणी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित

इमेज
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कारवाई मुंबई,दि.१४: मेट्रो लाईन४ श(वडाळा-कासारवडवली) मार्गावर मुलुंड येथे झालेल्या दुर्घटने प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे,यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत.अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतानाच जखमींच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीए करणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.एमएमआरडीए प्रशासनाकडून दुर्घटनेची माहिती घेतानाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सार्वजनिक सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही,असा इशारा दिला.या दुर्घटनेची दखल घेत त्यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांचे निलंबनाचे निर्देश दिले.

णमोकार तीर्थ हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर ते मानवतेला दिशा देणारे आध्यात्मिक विद्यापीठ - मंत्री छगन भुजबळ

इमेज
णमोकार तीर्थ आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा एवं महास्तकाभिषेक महोत्सवास मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती णमोकार तीर्थ हे केवळ मंदिर न राहता ते विश्वशांतीचा संदेश देणारे केंद्र बनेल - मंत्री छगन भुजबळ जगाच्या तणावाच्या परिस्थितीत शांतता निर्माण करण्यासाठी जैन समाजाचा अहिंसेचा विचार अधिक महत्वाचा - मंत्री छगन भुजबळ (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक,चांदवड  :- णमोकार तीर्थ हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ते मानवतेला दिशा देणारे आध्यात्मिक विद्यापीठ आहे.जैन धर्माने जगाला अहिंसा, सत्य,करुणा आणि संयम यांचा संदेश दिला आहे. आजच्या अस्थिर आणि तणावपूर्ण वातावरणात हा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. आजच्या या जगाच्या तणावाच्या परिस्थितीत जगात अहिंसा निर्माण होण्यासाठी जैन समाजाचे योगदान अतिशय महत्त्वाचे राहील असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.णमोकार तीर्थ,आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा एवं महास्तकाभिषेक महोत्सव, मालसाने,ता.चांदवड, जि.नाशिक येथे आज मोक्षकल्याण, विश्वशांती महायज्ञ आणि समारोप सोहळा पार पडला.सोहळ्यास रा...

त्र्यंबकेश्वरला जाताय,शिवरात्री यात्रे निमित्त मंदिर ट्रस्टची महत्वाची माहिती

इमेज
विडीओ माहिती बघण्यासाठी लिंक क्लिक करावे त्रंबकेश्वर :- महाशिवरात्री निमित्त श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे खालील प्रमाणे निवेदन प्रसिध्द करण्यात येत आहे.श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची महाशिवरात्रीच्या पार्श्वभुमीवर जय्यत तयारी.महाशिवरात्री निमित्त श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगाचे मंदिर रविवार दि.१५/०२/२०२६ रोजी सकाळी ०४:०० वाजेपासून सोमवार दि.१६/०२/२०२६ रोजी रात्री ०९:०० वाजेपर्यंत भाविकांना दर्शनार्थ खुले राहील.त्याकरिता पूर्व दरवाजा दर्शन बारी येथून भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येईल.भाविकांची श्री त्र्यंबकराजांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता,कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरिता सर्व प्रकारचे व्हि.आय.पी. प्रोटोकॉल व गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहे.त्याचप्रमाणे दि. १५/०२/२०२६ रोजी देणगी दर्शन देखील संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.दिनांक १४/०२/२०२६ ते १६/०२/२०२६ रोजी सकाळी मंदिर उघडल्यापासून सकाळी १०:३० वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक गावकरी यांनी पश्चिम द्वाराने ओळखपत्र (आधारकार्ड) दाखवून प...

शिवजन्सोमोत्सव समितीच्या वतीने स्टेज भुमीपुजन संपन्न

इमेज
इंदिरानगर :- सर्वधर्मसमभाव सर्वपक्षीय एकजुटीने अशोक मार्ग,श्री.श्री.रविशंकर मार्ग नाशिक,येथे शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने स्टेजचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने आयोजित या कार्यक्रमास प्रभाग क्रं.२३ व ३० मधील नगरसेवका रुपाली निकुळे,सुप्रिया खोडे,मंगला नन्नावरे,संध्या कुलकर्णी,मा.नगरसेवक यशवंत निकुळे,सुनील खोडे,योगेश म्हस्के,प्रवीण जाधव, यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,ज्येष्ठ नागरिक,माता-भगिनी तसेच मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता.कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.या प्रसंगी शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष अजिंक्य वहाडणे,उपाध्यक्ष प्रवेन गवारे, कार्याध्यक्ष महेश पाटील,खजिनदार साहिल पाटील,सरचिटणीस संदीप बोराडे,ऋषिकेश चव्हाण,यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे परिश्रम घेतले.यावेळी उपस्थित मान्यवर व शिवभक्तांनी आगामी शिवजन्मोत्सव सोहळा अधिक उत्साहात,शिस्तबद्ध पद्धतीने व सामा...

अभोणा ग्रामपंचायत नळपाणी योजना कामांची चौकशी करण्याची मागणी

इमेज
विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे कळवण :- अभोणा ग्रामपंचायत ने निकृष्ट दर्जाचे पाईप टाकल्याचा ग्रामस्थाचा आरोप,पाईप फुटल्याने परिसरात पाण्याची तळे तयार झाले आहे रस्ता बंद झाला.यात्रा उत्सव असल्यामुळे याबाबत सरपंच,ग्रामसेवक,यांना कळवूनही दखल न घेतल्याने परिसरातील रहिवासी तसेच भ्रष्टाचार निर्मूलन जनआंदोलनचे माजी तालुकाध्यक्ष विजय चव्हाण,संतप्त झाले आहे.राज्य व केंद्र सरकारच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी येऊनही दर्जेदार काम होत नसल्याने कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.घटनास्थळावरील परिस्थिती दाखवत त्यांनी चित्रफीत रेकॉर्ड केली असून सीईओ तसेच जिल्हाधिकारी यांनी याबाबत दखल घेत कारवाई करण्याची मागणी केली.

त्र्यंबकेश्वरला मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

इमेज
नाशिक,त्र्यंबकेश्वर :- महाकुंभ २०२६ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे सर्व आखाड्यांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व शुभारंभ संपन्न झाले.महाकुंभाच्या यशस्वी आयोजनासाठी आखाडे,महंत,साधू-संत यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्या सुविधांसाठी दर्जेदार व टिकाऊ पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.कुंभमेळ्याचे नियोजन करताना सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत,तसेच कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये,असे स्पष्ट निर्देश यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.याप्रसंगी महंत साधू-संत,आखाडा परिषदेचे पदाधिकारी,स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासन यांच्या सहकार्याने नाशिक–त्र्यंबकेश्वर महाकुंभ २०२६ निश्चितच भव्य,सुव्यवस्थित व जागतिक दर्जाचा होईल,असा विश्वास मंत्री महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.प्रसंगी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री.महंत रवींद्रपुरीजी (निरंजनी आखाडा),अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरीगिरीजी महाराज,कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती,विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम,कुं...

हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश. वृक्ष लागवड मोहिमेत स्टार्टअपचा सहभाग घ्यावा. रोप निर्मितीसाठी खासगी नर्सरी व बचतगटांचा सहभाग घ्यावा. मुंबई,दि.२ :- पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ३०० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात या क्षेत्रातील तज्ज्ञ,स्वयंसेवी संस्था याच्याबरोबरच स्टार्टअपचा सहभाग घ्यावा,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.प्रस्तावित हरित प्राधिकरण-३०० कोटी वृक्ष लागवड मिशन संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवास्थानी आढावा बैठक झाली.त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,राज्यातील वनक्षेत्र ३३ टक्के करण्यासाठी मिशन मोडवर हा कार्यक्रम हाती घ्यावा. या कार्यक्रमाच्या समन्वयासाठी हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा.शासकीय विभाग,विविध संस्थाबरो...

अशोका मार्ग श्री.श्री.रविशंकर मार्ग शिवजन्मोत्सव सोहळा समिती बैठक पदाधिकाऱ्यांची निवड

इमेज
नाशिक :- दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरा होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने आज ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ईश्वर प्रतिष्ठा–२, श्री. श्री.रविशंकर मार्ग,अपोलो फार्मसी शेजारी, नाशिक येथे एक महत्त्वाची बैठक उत्साहात पार पडली.या बैठकीस नागरिक,ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. शिवजन्मोत्सव सोहळा अधिक भव्य,शिस्तबद्ध व यशस्वी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून व आशीर्वाद घेऊन करण्यात आली.याप्रसंगी शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या.अध्यक्ष अजिंक्य बाळा वाढणे,उपाध्यक्ष प्रवेन घोलु गवारे,कार्याध्यक्ष साहिल पाटील, खजिनदार महेश पाटील, सरचिटणीस संदीप बोराडे,ऋषीकेश चव्हाण,यांची एकमताने निवड करण्यात आली.तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.नियोजन, जबाबदाऱ्या वाटप व समन्वय यावर विशेष भर देण्यात आला.उपस्थित सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.मोठ्य...

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व.अजितदादा पवार यांच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन

इमेज
नाशिक,दि.२ फेब्रुवारी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या अस्थींचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिकच्या रामकुंडावर विधिवत पूजन करत विसर्जन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांचे अस्थिकलश आज नाशिक येथे आणले.आज नाशिक येथे श्रद्धांजली वाहिल्यानंतर रामकुंडावर अस्थींचे विधिवत पूजन करत विसर्जन करण्यात आले.यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ,माजी खासदार समीर भुजबळ,आमदार पंकज भुजबळ आमदार माणिकराव कोकाटे,आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर,आमदार सरोज आहिरे,माजी आमदार जयवंतराव जाधव, नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे,काँग्रेसचे शरद आहेर, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे,आनंद सोनवणे,सीमंतिनी कोक...