नाशिक मध्ये MNGL कडून 'नॅशनल पीएनजी ड्राईव्ह २.०' चा शुभारंभ
आर्यवर्त सोसायटीमध्ये पीएनजी पुरवठा सुरू
नाशिक,१जाने :- महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL), जे गेल (GAIL), बीपीसीएल (BPCL) आणि महाराष्ट्र सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे, त्यांनी आज 'नॅशनल पीएनजी ड्राईव्ह २.०' (National PNG Drive 2.0) चा शुभारंभ केला.याचसोबत आर्यवर्त सोसायटीमध्ये पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) पुरवठ्याचा प्रारंभ करण्यात आला.
या सोहळ्याचे आयोजन सोसायटीच्या आवारात करण्यात आले होते.यावेळी एमएनजीएलचे कार्यालयीन प्रमुख संदीप श्रीवास्तव,सोसायटीचे चेअरमन दत्तात्रेय कडव, सचिव जोशी सर यांच्यासह MNGL चे अधिकारी, सोसायटीचे पदाधिकारी, रहिवासी उपस्थित होते.'नॅशनल पीएनजी ड्राईव्ह २.०' हा पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाद्वारे (PNGRB) देशभरात पीएनजीचा वापर वाढवण्यासाठी राबवला जाणारा उपक्रम आहे. गॅस-आधारित अर्थव्यवस्था निर्माण करणे आणि पारंपारिक इंधनावरील अवलंबित्व कमी करणे या भारत सरकारच्या संकल्पनेशी हा उपक्रम सुसंगत आहे.या कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक दीपप्रज्वलनाने झाली.यावेळी MNGL च्या अधिकाऱ्यांनी पीएनजीच्या फायद्यांवर प्रकाश टाकला,ज्यामध्ये अखंड पुरवठा,वाढीव सुरक्षा, कार्यक्षमता आणि पर्यावरणाचे फायदे यांचा समावेश आहे. रहिवाशांना पीएनजी जोडणीची प्रक्रिया आणि MNGL च्या ग्राहक योजनांची माहितीही देण्यात आली.MNGL ने यावेळी ग्राहकांना'My MNGL' मोबाईल ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले. या ॲपद्वारे बिल भरणे, मीटर रीडिंग सादर करणे आणि तक्रार नोंदवणे यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. कार्यक्रमाची सांगता आभारप्रदर्शनाने झाली,ज्यानंतर रहिवाशांसाठी नोंदणी मोहीम आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा