उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमध्ये राष्ट्रवादी शिवसेना युतीची सभा



राष्ट्रवादी शिवसेना युती शहराच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देईल - प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे

नाशिक,दि.१० जानेवारी :- राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नाशिक शहर व जिल्ह्यात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे या शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. आता यापुढील काळात विकासाच्या दृष्टीने एकत्र आलेली शिवसेना राष्ट्रवादीची युती या नाशिक शहराच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनल तटकरे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन सेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनील तटकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांची सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री गुलाबराव पाटील,माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे, आमदार किशोर दराडे, आमदार सुहास कांदे, शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्य्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,रिपब्लिकन सेना युतीचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की, नाशिक कृषि उत्पादनात अग्रेसर असा जिल्हा आहे. या नाशिक शहर व जिल्ह्याने औद्योगिक क्षेत्रात देखील आता आघाडी घेतली आहे. यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांचे योगदान अतिशय म्हत्वाचे आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहर आणि जिल्ह्यात पायाभूत सुविधांचे मोठे जाळे निर्माण केले. मुंबई नाशिक रस्त्यासह अनेक महत्वपूर्ण विकासाची कामे केली आहे. त्याचदृष्टीने नाशिकच्या विकासासाठी शिवसेना राष्ट्रवादी युती केली असून नाशिकच्या अधिक पायाभूत सुविधांचा विकास यापुढील काळात आपण करणार आहोत. या सभेस नाशिककरांची उपस्थिती ही शिवसेना राष्ट्रवादीच्या विजय निश्चित केला आहे. आगामी काळात नाशिक महानगरपालिकेत शिवसेना राष्ट्रवादी युतीची सत्ता आल्यानंतर या शहराच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देण्याचे काम केले जाईल. युतीचे सर्व नगरसेवक हे सेवाभाव वृत्तीने या शहराची सेवा करतील असा विश्वास व्यक्त करत शिवसेना व युतीच्या उमेदवारांना सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी