नाशिकमध्ये सकल मराठा परिवाराच्या वतीने वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा आणि जलदान उपक्रम संपन्न




(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- राजमाता जिजाऊ जन्मोत्सव, स्वामी विवेकानंद जयंती आणि संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर यात्रेचे औचित्य साधून नाशिकमधील 'सकल मराठा परिवाराच्या' (SMP) वतीने त्र्यंबकेश्वरकडे पायी निघालेल्या वारकरी बांधवांची सेवा करण्यात आली.सातपूर येथील पपया नर्सरी परिसरात मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.'वारकरी सेवा हीच खरी शिवभक्ती' हा विचार केंद्रस्थानी ठेवून सोमवारी (दि. १२ जानेवारी) सकाळी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने वारकरी नाशिकमार्गे पायी प्रवास करतात. या प्रवासात वारकऱ्यांना आरोग्यविषयक समस्या जाणवू नयेत,यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे त्यांची जागेवरच तपासणी करून आवश्यक औषधे मोफत उपलब्ध करून देण्यात आली. तसेच वाढत्या उन्हाचा विचार करता जलदानाची सेवाही देण्यात आली.या उपक्रमाबाबत माहिती देताना आयोजकांनी सांगितले की,"राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी समाजातील वारकरी घटकाची सेवा करणे,हेच आमच्यासाठी खरे अभिमानास्पद कार्य आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला ही सेवा अर्पण करताना आम्हाला आनंद होत आहे."या सेवाकार्यात सकल मराठा परिवाराचे सदस्य खंडू आहेर, शुभम आहेर, प्रवीण देशमुख,डॉ.विकास मेदगे, डॉ. नितीन देशमुख,ऍड.गौरव मोहिते,आनंद पाटील,योगेश वरखेडे,स्नेहल काळे,नंदकुमार सोनवणे,धनाजी आगळे,दिनेश मेदगे,राहुल पाटील,यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.या उपक्रमाचे वारकरी बांधवांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून मोठे कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी