अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक यांना ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन AWR अँड हर्निया सर्जरी’ (COEAWR) मान्यता


ओबेसिटी क्लिनिकचेही भव्य उद्घाटन

नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक यांना Abdominal Wall Reconstruction Surgeons’ Community (AWRSC) तर्फे ‘Center of Excellence in AWR & Hernia Surgery (COEAWR)’ ही मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या मान्यतेमुळे अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलला Abdominal Wall Reconstruction (AWR) Surgery आणि Hernia Surgery या क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेसाठी “सेंटर ऑफ एक्सलन्स” म्हणून अधिकृत ओळख मिळाली आहे.ही मान्यता १ जानेवारी २०२६ पासून पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार असून, उत्तर महाराष्ट्रातील आरोग्यसेवा क्षेत्रासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.ही मान्यता प्रामुख्याने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे वरिष्ठ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सर्जन डॉ. संदीप सी. सबनीस,यांच्या नेतृत्वाखाली AWR व हर्निया शस्त्रक्रियांच्या क्षेत्रात करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण,उच्च दर्जाच्या आणि रुग्ण-केंद्रित कामगिरीबद्दल देण्यात आली आहे.त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये डॉ.प्रखर गुप्ता,डॉ.उर्विक पाटील, आणि डॉ. हेमंत बागुल,यांचा मोलाचा सहभाग असून, हॉस्पिटलचे भूलतज्ञ,ऑपरेशन थिएटर (OT) टीम आणि नर्सिंग स्टाफ यांच्या उत्कृष्ट टीमवर्कमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे.यावेळी प्रतिक्रिया देताना डॉ. संदीप सबनीस म्हणाले,“COEAWR ही मान्यता केवळ अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल टीमसाठीच नव्हे, तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील आरोग्यव्यवस्थेसाठी गौरवाची बाब आहे. AWR आणि हर्निया सर्जरीमध्ये सुरक्षितता, अचूकता आणि रुग्णाचा जलद पुनर्वसन हा आमचा मुख्य उद्देश राहिला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय उपचारपद्धती आणि उत्कृष्ट टीमवर्क यांच्या जोरावर आम्ही रुग्णांना जागतिक दर्जाच्या शस्त्रक्रिया नाशिकमध्येच उपलब्ध करून देत आहोत.”अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी,यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले,“ही मान्यता अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया विभागातील उत्कृष्टतेची पावती आहे. AWR व हर्निया सर्जरीसोबतच गॅस्ट्रोइंटेस्टाइनल शस्त्रक्रिया,लिव्हर ट्रान्सप्लांट,मिनिमली इन्वेसिव्ह सर्जरी तसेच इतर सुपर-स्पेशालिटी शस्त्रक्रियांच्या क्षेत्रात आमचे डॉक्टर सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. रुग्ण-केंद्रित दृष्टिकोन,अत्याधुनिक सुविधा आणि अनुभवी वैद्यकीय टीम यांच्या बळावर नाशिक व उत्तर महाराष्ट्रासाठी आम्ही उत्कृष्ट आरोग्यसेवा देत आहोत.या मान्यतेच्या निमित्ताने, रुग्णांना सर्वांगीण आणि दीर्घकालीन आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये‘ओबेसिटी क्लिनिक’(स्थूलत्व उपचार केंद्र) चेही उद्घाटन करण्यात येत आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे स्थूलत्व (Obesity) ही एक गंभीर आरोग्य समस्या बनली असून,मधुमेह,उच्च रक्तदाब,हृदयविकार, सांधेदुखी, झोपेत श्वासोच्छवासाचा त्रास (Sleep Apnea),फॅटी लिव्हर तसेच पचनसंस्थेचे विविध आजार यांसारख्या अनेक समस्यांचे मूळ ठरत आहे.या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात येणाऱ्या ओबेसिटी क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांना वजन कमी करण्यासाठी वैयक्तिकृत (Personalized) उपचार योजना, आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन,व्यायाम व जीवनशैली सुधारणा, हार्मोनल व मेटाबॉलिक तपासण्या, तसेच आवश्यकतेनुसार औषधोपचार आणि तज्ज्ञांचा सल्ला दिला जाणार आहे.या क्लिनिकचे मुख्य उद्दिष्ट केवळ वजन कमी करणे नसून,रुग्णांचे एकूण आरोग्य सुधारून दीर्घकालीन निरोगी जीवनशैली निर्माण करणे हे आहे.COEAWR ही मान्यता मिळाल्यामुळे अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने AWR व हर्निया सर्जरीच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख अधिक मजबूत केली असून, भविष्यातही अत्याधुनिक, सुरक्षित आणि विश्वासार्ह शस्त्रक्रिया सेवा देण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी