राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी नाशिकमध्ये सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन


शोकसभेस मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सरकार मधील प्रमुख मंत्री,विविध पक्षाचे आमदार आणि नेते मंडळी राहणार उपस्थित
नाशिक,दि.३१ जानेवारी :- नाशिक शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता नाशिक शहरातील महाकवी कालिदास मंदिर सभागृह येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.स्व.अजितदादा पवार यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात सामाजिक, राजकीय व जनहिताच्या कार्यातून जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते.त्यांच्या अकाली निधनाने राज्याच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्व स्तरातून शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत.या सर्वपक्षीय शोकसभेस राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सरकार मधील प्रमुख मंत्री,विविध पक्षांचे खासदार,आमदार,पदाधिकारी,कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी तसेच नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.या शोकसभेत स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व सर्व नागरिकांनी या शोकसभेस उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी