प्रभाग क्रमांक २३ मधील भाजपच्या उमेदवारांनी आयोजित केलेल्या प्रचार फेरीला उदंड प्रतिसाद ठिक ठिकाणी स्वागत

इंदिरानगर :- प्रभाग क्रमांक २३ मधील भाजपचे चारही उमेदवारांनी संपुर्ण प्रभाग पिंजून काढला असुन, गोविंद नगर म्हसोबा महाराज मंदीरापासून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणावर प्रभागातील महिला नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने उपस्थिती लावली सर्वज्ञ नगर सप्तशृंगी माता मंदिर परिसर‌ रॉयल कॉलनी प्रभू एम्पायर गोकुळ नगरी,श्याम ऑरनेट, रविशंकर मार्ग,अरण्यश्वर महादेव मंदिर परिसर,आशिष हेरिटेज,जागृती प्रतिष्ठान,आदींसह भागातून निघालेल्या प्रचार फेरीचे नागरिकांनी उत्साहात स्वागत केले.याप्रसंगी मंगेश काळे, अविनाश बुरकुले,सुनील माधव खोडे,प्रीतम गोस्वामी, हर्षद सोनवणे,भीमा शेठ मंगळूरे,सुनील कुलकर्णी, कहाणे साहेब,काकडे साहेब अनिल पवार,सोमनाथ आव्हाड,शांताराम नव्हाळे, बडगुजर साहेब, सरोदे साहेब शिंपी साहेब कविता शिरोळे नंदा बुचकुले,पुनम शिंदे, पेटकर ताई,कहाणे ताई,कर्हाडताई आदींसह मोठ्या प्रमाणावर प्रभागातील महिला नागरिकांनी प्रभाग क्रमांक २३ चे भाजपाच्या उमेदवार मा.नगरसेविका सौ रुपाली यशवंत निकुळे अ गट,मंगला नन्नावरे ब गट,संध्या कुलकर्णी क गट,ड गटातून जेष्ठ माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे,यांचे स्वागत केले.प्रचार फेरी प्रसंगी चारही उमेदवारांनी प्रसिद्धी प्रमुख न्यूज शी बोलताना मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी