भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक २३ मधील सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करावे - मंत्री गिरीश महाजन

नाशिक :-  महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज प्रभाग क्रमांक २३ मध्ये आयोजित सभेला मंत्री गिरीश महाजन यांनी संबोधित केले.यावेळी त्यांनी उमेदवार रुपाली निकुळे,मंगला नन्नावरे,संध्या कुलकर्णी,चंद्रकांत खोडे,यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनीही प्रभाग क्रमांक २३.च्यासर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.या सभेसाठी राज्याचे जलसंपदा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन,आ देवयानी फरांदे,यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी,नेते रवि अनासपुरे,माजी महापौर सतीश कुलकर्णी,अविनाश आंधळे, सुनील खोडे,श्याम पाटिल,प्रकाश ननावरे,अमृता सांगळे,अर्जुन काळे,आदींसह प्रभागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंत्री गिरीश महाजन,यांनी यावेळी सांगितले की केंद्रात राज्यात,भारतीय जनता पक्षाचे सरकार असून नाशिक महानगर पालिकेतही भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर विकास कामे मोठ्या प्रमाणावर होतील.यावेळी प्रभाग क्रमांक २३ मधील उमेदवार रुपालीताई यशवंत निकुळे,मंगला नन्नावरे,संध्या कुलकर्णी,चंद्रकांत खोडे,व माजी महापौर सतीश कुलकर्णी, यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस भूमिका,जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य आणि सक्षम नेतृत्वाच्या बळावर हा प्रभाग भाजपचा बालेकिल्ला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.याप्रसंगी देवयानी फरांदे यांनी सांगितले की कार्यकर्त्यांची ऊर्जा आणि नागरिकांचा विश्वास हीच यानिवडणुकीतील खरी ताकद आहे.सभेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे अभिनंदन व आभार आ.प्रा.देवयानी फरांदे यांनी यावेळी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी