ना.रोड रेल्वे स्टेशन येथील स्टॅाल मधून चोरी करणारे दोघे पोलीसांच्या ताब्यात

नाशिक रोड :- फिर्यादी नामे इंद्र प्रताप सिंह वय 22 वर्ष धंदा स्टाँल वेडर रेल्वे स्टेशन नाशिक रोड हे दिनांक 1-1-2026 रोजी रेल्वे स्टेशन नाशिक रोड स्टाँल वर रात्रपाळी ड्युटी कामी हजर असताना दोन संशयित इसमा पैकी एका इसमाने त्यांना बोलण्यात गुग ठेवून त्यांच्या दुकानातील तोंडाला लावण्याचे मास्क परफ्युम बॉटल इयर बर्ड एकुण 5400 रोख रुपये असा 9475 रुपयाचा किंमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात दोन इस्मानी चोरून नेला म्हणून आज 1-1-2026 रोजी रेल्वे पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे येऊन सामान चोरी झाल्या बाबत लेखी फिर्याद दिली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला गु.र.नंबर 1/26 कलम 305(1),3 (5 ) सी बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासी अंमलदार सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील,यांच्याकडे देण्यात आला प्रभारी अधिकारी सचिन बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रय उफाडे पाटील, यांना गुप्त बातमी द्वारा कडून माहिती मिळाली एक काळ जॅकेट घातलेले दोन इसम हे रेल्वे स्टेशन मेन गेट येथे उभे आहेत त्यांना संतोष उफाडे पाटील,पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील,राज बच्छाव,आर पी एफ कृष्णा यादव यांनी ताब्यात घेऊन रेल्वे पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे आणून गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्यांनी रात्री दारू पिऊन गुन्हा केल्याची कबुली दिली व वरिल प्रमाणे 9375 रूपयाचा मुद्देमाल काढून दिला व सदर आरोपी नामे कृष्णा प्रकाश कांबळे,29 वर्ष राहणार शिवाजी चौक नाशिक रोड,आरोपी क्र 2 निखिल विनोद खराटे, वय 22 वर्ष राहणार जय भवानी रोड रोकडोबा वाडी नाशिक रोड यांना 24 तासांच्या आत अटक करण्यात आली व गुन्हायातील मुद्देमाल दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आला.ही कामगिरी लोहमार्ग छत्रपती संभाजी नगर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,उपविभागीय पोलिस अधिकारी मनमाड  वसंत भोये प्रभारी अधिकारी सचिन बनकर,आर पी एफ इन्स्पेक्टर नविन प्रताप सिंह,यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील,पोलीस हवालदार शैलेश पाटील,पोलीस हवालदार हजर करण्यात आले असता आरोपी ला14 दिवस मॅजिस्ट्रेट कस्टडी देण्यात आली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी