शहरातील रोटरी क्लब हाॅल येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न
नाशिक दि.18:- नाशिक शहरासह जिल्ह्यातील पत्रकारांचा राष्ट्रीय प्रेस महासंघ स्टार न्यूज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी क्लब हॉल गंजमाळ येथे सन्मान सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त,जयंत महाजन संपादक दैनिक महासागर,नगरसेविका हिंमगौरी आडके, सपकाळे सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक,प्राचार्य श्रीकांत सोनवणे,शरद तायडे,शरद आलई,नाशिक स्टार न्यूज चे संचालक विलास सूर्यवंशी,पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप दीक्षित,प्रदेशउपाध्यक्ष अनिल वैद्य,उपाध्यक्ष किशोर दीक्षित,नाशिक शहराध्यक्ष राजेश गोसावी,डॉ रेश्मा घोडेराव,क्राइम रिपोर्टर तबरेज शेख,आदी मान्यवर उपस्थित होते.पत्रकार दिनानिमित्त सोहळ्यात शंभर पत्रकारांचा सन्मानचिन्ह प्रमाणपञ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीकांत सोनवणे,हे होते कार्यक्रमांचे शेवटी आभार विलास सुर्यवंशी,यांनी मानले.सोहळा यशस्वी करण्यासाठी स्टार न्यूजचे राजेश गोसावी,दीपक भावसार,संजय राजगुरू,हेमंत कुलकर्णी,सदाशिव जगताप,विलास बोरसे,सोनू आडके,विजय ठाकूर,नानासाहेब देवरे,संदीप जोजारे,राजेंद्र दोंदे,मोसिन पठाण,विक्रम गायकवाड,कोमल वाकचौरे,माधुरी निकम,मंदा पवार,आदीनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा