दोन पिस्तूल आठ जिवंत काडतुसासह दोघे ताब्यात नाशिक ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

नाशिक :- मालेगाव शहरात अवैधरीत्या घातक पिस्तूल बाळगणारे सराईत गुन्हेगार जेरबंद नाशिक ग्रामीण पोलीस दल स्थानिक गुन्हे शाखा किल्ला पोलीस ठाणे मालेगाव यांची संयुक्त कारवाई दोन देशी बनावटीच्या बंदूक आठ जिवंत काडतुस हस्तगत.नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार ‌जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी तत्पर कारवाई करण्यात येत आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर,यांना दिनांक ०४/०१/२०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहिती मिळाली की मालेगाव शहरातील किल्ला पोलीस ठाणे हद्दीत दोन संशयित इसम अवैधरीत्या अग्नी शस्त्र घातक पिस्तूल दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने परिसरात फिरत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने,किल्ला पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी अंमलदार यांनी शहरातील इस्लामाबाद भागातून १)हिदायत शरीफ शेख वय २७ रा.भारत सिनेमा हाॅलजवळ न्यु नाना पेठ पुणे जिल्हा पुणे २)अब्दुल मलीक अकील अहमद वय १९ रा.ईस्लामाबाद मालेगाव ता मालेगाव जि.नाशिक,या दोघांना ताब्यात घेतले त्यांची अंगझडतीत दोन देशी बनावटीच्या बंदूकीसह आठ जिवंत काडतुस वरील दोघा विरुद्ध मालेगाव किल्ला पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील आरोपीत हिदायत शेख हा पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे ०६ गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेजबीर सिंह संधु,सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर सिद्धार्थ बारवाल, सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प विभाग दर्शन दुगड,यांच्या मार्गदर्शन सुचनाप्रमाणे निरिक्षक रवींद्र मगर,किल्ला पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर पाटील,पो उपनिरीक्षक दत्ता गंभीरे, भुषण चव्हाण,अंमलदार सुभाष चोपडा,दत्ता माळी,योगेश कोळी,पंकज भोये, अंबादास डामसे,विजय तावडे,यांच्या पथकाने केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी