अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथे मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी विभागात“मोटिलिटी क्लिनिक”चा शुभारंभ


(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी विभागात पचनसंस्थेशी संबंधित हालचाली (Gut Motility) आणि कार्यातील बिघाडामुळे होणाऱ्या त्रासांवर अचूक निदान व प्रभावी उपचार देण्यासाठी “मोटिलिटी क्लिनिक” (Motility Clinic) सुरू करण्यात आले आहे.हे क्लिनिक डॉ.सोहम दोशी,डॉ.संदीप पाटील आणि डॉ. अमोल शिंदे यांच्या तज्ज्ञ टीमच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार आहे.आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना ॲसिडिटी, सतत पोट फुगणे, पोटात जडपणा,अन्न गिळताना त्रास,छातीत जळजळ,वारंवार ढेकर येणे,मळमळ,उलट्या,बद्धकोष्ठता,जुलाब, मलावरोध,तसेच“इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS)”सारख्या समस्या वाढताना दिसतात. अनेक वेळा नियमित तपासण्यांमध्ये काहीही गंभीर आढळत नाही, मात्र पचनसंस्थेची हालचाल आणि कार्यातील असंतुलन हे यामागचे मुख्य कारण असू शकते.अशा रुग्णांसाठी मोटिलिटी क्लिनिक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.या क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांना सविस्तर सल्लामसलत,लक्षणांचे शास्त्रीय मूल्यांकन,योग्य तपासण्यांचे नियोजन तसेच वैयक्तिकृत उपचार योजना देण्यात येणार आहे.यामध्ये आहार व जीवनशैली मार्गदर्शन,औषधोपचार,तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारांची दिशा ठरवण्यात येईल.यावेळी प्रतिक्रिया देताना डॉ.सोहम दोशी, म्हणाले,“मोटिलिटी डिसऑर्डर्स हे अनेक रुग्णांमध्ये दीर्घकाळ दुर्लक्षित राहतात.योग्य निदान आणि नियोजित उपचारांमुळे रुग्णांचे दैनंदिन जीवनमान लक्षणीयरीत्या सुधारू शकते. या क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही रुग्णांना आधुनिक आणि रुग्ण-केंद्रित उपचार देण्याचा प्रयत्न करणार आहोत.”याप्रसंगी बोलताना डॉ.संदीप पाटील आणि डॉ.अमोल शिंदे,यांनी सांगितले की,“मोटिलिटी क्लिनिकमुळे पचनसंस्थेच्या गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये अचूक निदान व प्रभावी उपचार शक्य होणार असून,नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना आता तज्ज्ञ सेवा अधिक सहज उपलब्ध होईल.”अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी,यांनी या उपक्रमाचे स्वागत करत सांगितले की,“रुग्णांना विशेष उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हा आमचा सातत्यपूर्ण उद्देश आहे.मोटिलिटी क्लिनिकच्या माध्यमातून मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी विभाग अधिक सक्षम होईल आणि रुग्णांना सर्वसमावेशक पचनसंस्था उपचार सेवा एकाच ठिकाणी मिळेल.”

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी