प्रभाग २३ मध्ये भाजपा उमेदवारांची भव्य रॅली प्रभाग पिंजून काढत विजयाकडे वाटचाल


इंदिरानगर :- प्रभाग क्रमांक २३ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रुपालीताई निकुळे,मंगला नन्नावरे,संध्या कुलकर्णी,चंद्रकांत खोडे,या उमेदवारांच्या प्रचारार्थ डीजीपी नगर–१ व इंदिरा नगर परिसरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली .या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत औक्षण केले.प्रचार फेरी भारत नगर,नंदिनी नगर,शिवाजी वाडी,घरकुल योजना,दिपाली नगर,शर्मा मंगल कार्यालय,सुचिता नगर लेन,शिवसृष्टी कॉलनी, श्रीराम नगर,विनय नगर,अमृतवर्षा कॉलनी, साईनाथ नगर,इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक,गीतांजली कॉलनी,प्रसन्न कॉलनी,योगेश्वर कॉलनी, एलआयसी कॉलनी,शास्त्रीनगर,आदर्श कॉलनी, झेडपी कॉलनी,गुरुकृपा कॉलनी,सिद्धिविनायक कॉलनी परिसर, श्रीराम सोसायटी,बाबू बंगला परिसर,एसबीआय कॉर्निंग,चार वाजताच्या घरी चौक या मार्गाने मार्गक्रमण करत संपन्न झाली.यारॅलीत बापूसाहेब कुलकर्णी,अरुण दोंदे,वैशाली पिंगळे,सुनील बच्छाव,दिगंबर गवळी,सुरेश भावसार,योगेश घुगे,रवींद्र पाटील,विजय राळेगावकर, भगवान शिंदे,अरुण महाशब्दे,वैभव कुलकर्णी,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या प्रचार रॅलीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपा उमेदवारांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी