मनपाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा, विविध योजनांची माहिती
नाशिक :- नाशिक महानगरपालिका नाशिक,विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्रशासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजना आयुष्यमान भारत योजना, पीएम जनधन योजना, पीएम सुरक्षा विमा योजना, भारतीय जन औषधी योजना, अटल पेन्शन योजना, आत्मनिर्भर भारताच्या विकासाचे दृष्टीने नव्या युगाची सुरुवात अशा विविध केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती व शिबिराचे आयोजन नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून दिनांक २८ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान शहरातील विविध ६० ठिकाणी या यात्रेद्वारे आयोजन करण्यात आलेले आहे. विभागीय कार्यालय नाशिक पूर्व विभागातर्फे दिनांक २९.११.२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रा या माध्यमातून विविध योजना बाबत नागरिकांना व लाभार्थ्यांना माहिती देणे कामे कार्यक्रमाचा शुभारंभ उपायुक्त गोदावरी संवर्धन डॉ.विजयकुमार मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी विभागीय अधिकारी नाशिक पूर्व राजाराम जाधव,विभागीय नोडल वैद्यकीय अधिकारी नाशिक पूर्व डॉ.गणेश गरुड , जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद , अधीक्षक चंदन घुगे तसेच विभागीय कार्यालय नाश...