साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख
( प्रतिनिधी - कृष्णा शिरसाठ)
“गणेशोत्सवासाठी स्मार्ट रोड खुला प्रतिष्ठापना व मिरवणूक पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक म्युनिसीपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत होत असलेल्या स्मार्ट रोडची (दि. 31/08/2019) रोजी पाहणी केली. यावेळी नाशिक म्युनिसीपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, जीएम सिव्हील विश्राम पाटील, नगररचनाकार कांचन बोधले उपस्थित होते.
गणेशोत्वाच्या मिरवणुकीसाठी स्मार्ट रोड खुला होणार असून त्याची पाहणी आज मनपा आयुक्तांनी केली. दरम्यान मिरवणुकीचा मार्ग मेहेर सिग्नल ते अशोक स्तंभ दरम्यान स्मार्ट रोड मिरवणुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या मार्गावरील कामं अंतिम टप्प्यात आहेत. त्याचबरोबर त्र्यंबकनाका ते अशोक स्तंभ येथे आयुक्तांनी स्मार्ट रोडची पाहणी केली. या दरम्यानच्या रस्त्यामधील कामामध्ये काही सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित असलेल्या अभियंते आणि ठेकेदारांना केल्या. स्मार्ट रोडचे काम लवकरात लवकर मार्गी लागून नागरिकांसाठी तो लवकरात लवकर खुला करण्याच्या सूचनाही यावेळी आयुक्तांनी केल्या. स्मार्ट रोडवरील काँक्रीटीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, किरकोळ कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
त्यानंतर आयुक्त गमे यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत होत असलेल्या इंटीग्रेटेड कंट्रोल ॲण्ड कमांड सेंटरचीही पाहणी केली. इंटीग्रेटेड कंट्रोल ॲण्ड कमांड सेंटरचे काम वेगाने सुरू आहे. यावेळी यांनी नाशिक म्युनिसीपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, जीएम सिव्हील विश्राम पाटील, चीफ नॉलेज ऑफीसर प्रमोद गुर्जर उपस्थित होते.

Comments
Post a Comment