( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) भाजप ईच्छुकांच्या मुलाखती

प्रतिनीधी ( करणसिंग पवार)
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  नाशिक पूर्व, नाशिक मध्य व नाशिक पश्चिम  भाजपा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न.

नाशिक : दि.04 सप्टेंबर 2019 भाजपा वसंतस्मृती कार्यालय, नाशिक येथे भाजपातर्फे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती नगरविकास राज्यमंत्री तथा नाशिक विधानसभा निरीक्षक ना.योगश सागर यांच्या उपस्थितीत संपन्न झाल्या. केंद्र व राज्य सरकारच्या उत्तुंग कामगिरीमुळे प्रत्येक विधानसभा मतदार संघात अनेकजण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.  अशी माहिती शहराध्यक्ष गिरीष पालवे यांनी दिली.
          तत्पूर्वी कोअर कमिटीची बैठक नगरविकास राज्यमंत्री तथा नाशिक विधानसभा निरीक्षक ना.योगश सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीसप्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनिल बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीष पालवे,संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सरचिटणीस पवन भगुरकर,काशिनाथ शिलेदार, उत्तमराव उगले,संभाजी मोरुस्कर, आ.बाळासाहेब सानप, आ.सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, सभागृह नेता सतीश  सोनवणे, गटनेता जगदीश पाटील उपस्थित होते.
 मतदार संघ निहाय इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुलाखती खालील प्रमाणे.
नाशिक पूर्व विधानसभा –आ.बाळासाहेब सानप, सुनील केदार, अरुण पवार, उध्दव निमसे, प.पु.स्वामी प्रा.डॉ.तुळशीरामजी गुट्टे, हेमंत धात्रक, उत्तम उगले, कमलेश बोडके, सुनिल आडके, दिनकर आढाव, ॲड. मुकुंद आढाव, कांचन खाडे, बाळासाहेब पालवे, संभाजी मोरुस्कर, दामोदर मानकर, जगदीश गोडसे
नाशिक मध्य विधानसभा –आ.देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी, वसंत गिते, आशिष नहार, विजय साने, सुरेश पाटील, हिमगौरी आहेर-आडके, शिवाजी गांगुर्डे, गणेश कांबळे, कुणाल वाघ, सुनील खोडे
नाशिक पश्चिम विधानसभा –आ.सीमा हिरे, प्रदीप पेशकार, दिनकर पाटील, शशिकांत जाधव, कैलास आहिरे, अलका आहिरे, अनिल जाधव, सतिष सोनवणे, बाळासाहेब पाटील,  प्रशांत कोतकर, विक्रम नागरे, मुकेश शहाणे, निर्मला पवार, मयुर अलई, जगन पाटील, दिलीपकुमार भामरे, छाया देवांग या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. मुलाखती अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला