( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) राज्यपाल स्वागत

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख )
नवनियुक्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत
राजभवनात राष्ट्रीय सलामीच्या मानवंदनेसह स्वागत

मुंबई, दि. ०४/०९/२०१९ नवनियुक्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल कोश्यारी यांचे खास विमानाने आगमन झाले. त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
त्यानंतर राजभवन येथे पोलीस पथकाने राष्ट्रीय सलामीच्या मानवंदनेसह  कोश्यारी यांचे स्वागत केले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज्यपाल कोश्यारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, राज्यपालांचे सचिव वेणू गोपाल रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन