साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख - भाजप माध्यम विभाग कार्यशाळा

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख )
मुंबई, १४ सप्टेंबर २०१९

विधानसभा निवडणुकीत आपल्या सरकारची कामगिरी प्रभावीपणे मांडा
उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माध्यम विभागाला सूचना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी महायुती सरकारच्या पाच वर्षांच्या कामगिरीच्या आधारावर महायुती आगामी विधानसभा निवडणूक जिंकणार असून आपल्या सरकारची कामगिरी प्रभावीपणे मांडा, असे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी मुंबईत सांगितले.भाजपा, महाराष्ट्र प्रदेश माध्यम विभागाने आयोजित केलेल्या एक दिवसाच्या कार्यशाळेचे उद्घाटन  तावडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आणि सहमुख्य प्रवक्ते व माध्यमविभाग प्रमुख केशव उपाध्ये उपस्थित होते. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते, पॅनेलिस्ट, आणि सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी कार्यशाळेस उपस्थित होते
विनोद तावडे म्हणाले की, आपल्या राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात खूप कामे केली आहेत. या कामांच्या आधारावर सकारात्मक मतांच्या जोरावर भाजपा महायुती आगामी निवडणूक जिंकणार आहे. विरोधक निष्प्रभ झाल्यामुळे नव्हे तर कामगिरीमुळे भाजपाचा विजय होणार आहे. आपल्या सरकारच्या कामगिरीची सविस्तर माहिती घेऊन ती लोकांना सोप्या भाषेत सांगणे आवश्यक आहे.
त्यांनी सांगितले की, सध्या विरोधकांकडे भाजपा महायुती सरकारविरोधात बोलण्यासाठी काही मुद्दे नाहीत. त्यामुळे विरोधकांकडून खोटे मुद्दे मांडून अपप्रचाराचा प्रयत्न होईल. भाजपाच्या माध्यम विभागाने आपल्या केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती देऊन अपप्रचाराला उत्तर द्यावे.
व्यासपीठावर प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी, प्रदेश प्रवक्ते मधू चव्हाण, अतुल शाह, विश्वास पाठक, अवधूत वाघ, श्वेता शालिनी, भालचंद्र शिरसाट, इजाज देशमुख व अर्चना डेहनकर तसेच प्रदेश सोशल मीडिया सेलचे प्रभारी जितेन गजारिया आणि प्रदेश संयोजक प्रवीण आलई उपस्थित होते.
मिलिंद चाळके यांनी सूत्रसंचालन केले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला