Posts

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) व्यसनमुक्ती वर प्रकाशझोत टाकणारा चित्रपट सरकारमान्य येत्या २७ तारखेला प्रदशित

Image
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) प्रतीनीधी - श्रीराम क्रिएशन्स पुणे निर्मित चित्रपट सरकारमान्य दिनांक २७-०९-२०१९ ला  प्रदशित दिनांक २४-०९-२०१९ सरकारमान्य दारु दुकानाच्या भोवती व व्यसनमुक्ती च्या विषयावर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट आपल्या देशात महाराष्ट्रात स्त्री शिक्षण व स्वातंत्र्य साठी आपले आयुष्य खर्ची घालणारे सर्वच महामानवांना वंदन तथापि दुर्दैवाने एक वेगळेच ताट आपल्यापुढे वाढुन ठेवलेले आहे. आपल्या आजूबाजूला सरकारमान्य दारु या भयानक दैत्याने थैमान मांडले आहे. व त्याला शासनाची साथ मिळाली आहे. त्याच्यामुळेच संसार उध्वस्त होत आहे तेव्हा यांच्यावर एकच उपाय म्हणजे शासनमान्य असो अथवा खाजगी असो या विनाशक पदार्थांवर संपूर्ण पणे समाजाकडून बहिष्कार टाकला गेला पाहिजे तरच आपण जिवनात यशस्वी होऊ व्यसनमुक्ती दारुबंदी अमली.पदार्थ यामुळे होणाऱ्या दुष्परिणाम यावर प्रकाशझोत टाकणारा चित्रपट म्हणजे ( सरकारमान्य) निर्माती ,कथा,पटकथा, रवींद्र होनराव, दिग्दर्शक , अशोक झगडे कलाकार, सिकंदर मुलानी, सुवर्णा माने, अकुंश मांडेकर,पंकज तौर,जान्हवी पाटील, प्रदीप पानसरे,पुनम कापसे, सोनल गोरखे,सारंग मालसे...

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक मधे पुन्हा आणुया आपले सरकार चे केले आवाहन

Image
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) प्रतिनिधी - करणसिंग पवार - नाशिक  दिनांक १९ - ०९ -  २०१९ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला नवी दिशा दिली, पुन्हा आणूया आपले सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यातील जनतेला आवाहन महाराष्ट्रात यापूर्वी राजकीय अस्थिरतेमुळे हे राज्य आपल्या क्षमतेनुसार गतीने विकसीत झाले नाही. पण गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण बहुमत नसतानाही स्थिर, प्रगतीशिल आणि राज्याला समर्पित सरकार चालवून महाराष्ट्राला नवी दिशा दिली आहे. आता महाराष्ट्रातील जनतेची जबाबदारी आहे की,  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राजकीय स्थैर्याचा फायदा उठवला पाहिजे. “चला पुन्हा आणूया आपले सरकार,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  नाशिकमध्ये जाहीर सभेत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यव्यापी महाजनादेश यात्रेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधान बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपा माज...

साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख - भाजप माध्यम विभाग कार्यशाळा

Image
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) मुंबई, १४ सप्टेंबर २०१९ विधानसभा निवडणुकीत आपल्या सरकारची कामगिरी प्रभावीपणे मांडा उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माध्यम विभागाला सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी महायुती सरकारच्या पाच वर्षांच्या कामगिरीच्या आधारावर महायुती आगामी विधानसभा निवडणूक जिंकणार असून आपल्या सरकारची कामगिरी प्रभावीपणे मांडा, असे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी मुंबईत सांगितले.भाजपा, महाराष्ट्र प्रदेश माध्यम विभागाने आयोजित केलेल्या एक दिवसाच्या कार्यशाळेचे उद्घाटन  तावडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आणि सहमुख्य प्रवक्ते व माध्यमविभाग प्रमुख केशव उपाध्ये उपस्थित होते. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते, पॅनेलिस्ट, आणि सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी कार्यशाळेस उपस्थित होते विनोद तावडे म्हणाले की, आपल्या राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात खूप कामे केली आहेत. या कामांच्या आधारावर सकारात्मक मतांच्या जोरावर भाजपा महायुती आगामी निवडणूक जिंकणार आहे. विरोधक निष्प्रभ झाल...

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) आनंदवली मंडलिकांचा गणेश आरती

Image
साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ०८/०९/२०१९आपलं मित्र मंडळ प्रणित मंडलिकांच्या श्रीमंत चांदीच्या गणपती बाप्पाची आरती आनंदवल्ली गावातील  डाॅक्टर राहुल भोसले व  डाॅक्टर ललित जाधव यांनी सहपत्नी उपस्थितीत  केली. यावेळी मंडळ्याच्या पदाधिकारीं सह परिसरातील नागरिक व राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष चे ग्रामीण युवक अध्यक्ष सनिल पगारे,अनिल शिंदे, आदी उपस्थित.

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) मालेगाव वरीष्ठ पोलीस आधिकारींंनी घेतला बंदोबस्त चा आढावा

Image
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख )मालेगाव शहरात दिनांक १०/०९/२०१९ रोजी होणारे मोहरम ताजीया सवारी मिरवणूक व दि .१२/०९/२१९ रोजी होणारे गणेश विसर्जन मिरवणूकच्या अनुषंगाने ०७/०९/२०१९ रोजी मालेगाव शहरात मोहरम व गणेश विसर्जन मार्गाची तसेच गणेश विसर्जन स्थळाची पहाणी विशेष पोलीस महानिरीक्षक  छोरिगं दोरजे व पोलीस अधिक्षक डॉ .आरती सिंह  यांनी पहाणी केली. तसेच मिरवणूक मार्गात असणारे इलेक्ट्रीक तारा रस्त्यात असलेले खड्डे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व मनपा अधिकारी यांना मार्गावरील अडचणी दुर  करण्याच्या सुचना दिल्या.बंदोबस्ताचा आढावा घेतला. दोन्हीही मिरवणूकीसाठी चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. यावेळी अपर पोलीस अधिक्षक मालेगाव सर्व उप उभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) मंडलिकांचा मानाचे गणपतीची आरती

Image
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) दि. ०७/०९/२०१९ आपल मित्र मंडळ प्रणीत मंडलिकांचा श्रीमंत चांदीच्या गणपतीची आरती शिवसेना गटनेते विलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मा.सभापती सातपुर उषाताई बेंडकोळी, रमेश गायकवाड, शंतनु शिंदे ,भास्कर जेजुरकर, गिरीश बच्छाव, जिभाऊ आहीरे ,विलास आहेर, देवा जाधव ,किसन मंडलिक ,शरद मंडलिक, निगळ,सोमनाथ मंडलिक, प्रकाश मंडलिक, आदी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवेदन

Image
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) दि. ०७/०९/२०१९ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील गडकिल्ले संरक्षण मागणीसाठी जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील २५ किल्ले पर्यटन विकासाच्या नावाखाली भाड्याने देण्याच्या निर्णय रद्द करण्यात यावा. अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी गिरीश अकोलकर बाळासाहेब साळवे राजश्री वानखेडे. ग्रामीण युवा अध्यक्ष सनील पगारे रेश्मा बच्छाव अशोक बच्छाव उपस्थित होते.