Posts

Showing posts from April, 2024

पत्रकार भैयासाहेब कटारे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार रत्न पुरस्कार

Image
देवळाली कॅम्प प्रतिनिधी :- गरुड फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व व्यंकटेश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यामानाने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार समारंभ 2024 पार पडला.  राज्यस्तरीय "आदर्श पत्रकार रत्न पुरस्कार 2024" हा पुरस्कार नाशिक तालुका मराठी पत्रकार संघांचे "तालुका संघटक" पत्रकार  भैयासाहेब कटारे यांना देण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षेतर संघटनांचे महामंडळ सेक्रेटरी शिवाजी खांडेकर यांनी हा पुरस्कार प्रदान केला.  हा कार्यक्रम आळंदी पुणे येथील समृद्धी मंगल कार्यालय येथे रविवारी (दिनांक 21) पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी जनसंपर्क अधिकारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मधुकर चव्हाण माजी नगराध्यक्ष आळंदी नगरपरिषद आळंदी दे. राहुल चिताळकर, गरुड फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आकाश पुजारी, व्यंकटेश बहुउद्देशाय सेवाभावी संस्था आळंदी अध्यक्ष शिवकुमार देवकाते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण येथे शालेय नेतृत्व विकास कार्यशाळा संपन्न

Image
आंबेगण वार्ताहर :- डांग सेवा मंडळ नाशिक व नवनीत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच नेतृत्व विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता ताई बिडकर होत्या. तर नवनीत फाऊंडेशन सल्लागार तसेच महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. भारती हजारी,  विस्तार अधिकारी राजेंद्र नेरे, डाएट तज्ज्ञ प्रशिक्षक बाबासाहेब खरोटे,सचिन जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.  या प्रशिक्षणासाठी डांग सेवा मंडळाच्या अंतर्गत असलेल्या सर्व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. शालेय नेतृत्वाची जबाबदारी पार पाडताना येणाऱ्या अडचणी कशा पद्धतीने दुर करता येईल याचं उत्कृष्ट मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. नवनीत फाऊंडेशन तर्फे तज्ज्ञ प्रशिक्षक बाबासाहेब खरोटे यांनी नेतृत्व म्हणजे काय तसेच त्यांच्या प्रकारांची ओळख करून दिली, तर राजेंद्र नेरे यांनी मुख्याध्यापक यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली व पदभार सांभाळताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती सांगितली. त्यासोबत योग्य वेळी योग्य निर्णय घेण्या संदर्भात सर...

सीमेन्स वर्कर्स युनियनचा मुलुंड मुंबई येथे हिरक महोत्सव साजरा

मुंबई :- सीमेन्स वर्कर्स युनियनच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना निष्ठेने,विश्वासाने आणि प्रगती कडे वाटचालीच्या शुभेच्छा देऊन कामगार संघटनेत नव्या संकल्पना घेऊनच सातत्याने पुढे जाण्याचा ध्यास घेत आपण प्रगती करून दाखवली आहे.आणि त्यामुळेच साठ वर्षानंतर देखील आपली संघटना तरुण आहे असे प्रतिपादन युनियनचे सचिव गिरीश आष्टेकर  यांनी मुंबई येथील कार्यक्रमात केले.  मुलुंड मुंबई येथील कालिदास कला मंदिरात सीमेन्स वर्कर्स युनियनच्या हीरक महोत्सव कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सीमेन्स कंपनीचे सीईओ सुनिल माथूर,एच.आर.हेड, शिल्पा काबरा माहेश्वरी, एन.टी.यू.आयचे जनरल सेक्रेटरी गौतम मोदी, युनियनचे अध्यक्ष महेश सावंत-पटेल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आष्टेकर यांनी युनियनचा 60 वर्षाचा आढावा सादर करतांना म्हणाले की,भविष्यात वेतन करार होतीलच पण आता पुढे जात असताना इंडस्ट्री 4.0 आणि डिजिटलायझेशन,मर्जर- डिमर्जर अशीअनेकआव्हाने आहेत.सर्वांच्या सहकार्याने, विश्वासाने आणि व्यवस्थापनाच्या सहकार्याने यावरआपण मातकरु शकतो असा विश्वास व्यक्त केला. त्या माध्यमातून...