चांदवड येथील ऐतिहासिक वास्तू अहिल्यादेवी होळकर वाड्याचा (रंगमहाल ) होणार कायापालट - आमदार बच्चू कडू
चांदवड : २६ मार्च रोजी झालेल्या चांदवड रंगमहाल येथील मल्हार राव होळकर जन्मोत्सव सोहळा निमित्त उपस्थित प्रमुख पाहुणे माजी राज्यमंत्री आमदार बच्चु कडू यांनी जन्मोत्सवाचे अध्यक्ष समाधान बागल तसेच पदाधिकारी यांना मुंबईला मंत्रालयात बोलवून रंगमहाला संदर्भातील अडचणींची चौकशी केली तसेच आहिल्या सृष्टी निर्माण करण्यासाठी पर्यटन विभागाला तसेच मुख्यमंत्र्यांनाही पत्र व्यवहार केले असून लवकरात लवकर रंगमहालाचे डाग डुजी होऊन सर्वांसाठी हा ऐतिहासिक वाडा खुला करण्यात येईल असे याप्रसंगी बच्चू कडू यांनी सांगितले आहे.त्यानी स्वता खर्च न झालेल्या निधी बाबत जिल्हाधिकारी तसेच पुरातत्व विभागाकडे फोनवरून चौकशी केली.यावेळी लवकरच निर्णय घेतला जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अहिल्यासृष्टीसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून चांदवड नगरीमध्ये अश्वारुढ स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.ते चांदवडच्या होळकर वाडा रंगमहाल तसेच आहिल्यादेवी देवी होळकर यांच्या भव्य स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेत असल्याने समाजबांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. याप्रसंगी प्रहारचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, जिल्हा चिटणीस समाधान बागल, युवा जिल्हाध्यक्ष जगन काकडे, शहर प्रमुख श्याम गोसावी, अजय कापडणीस, व लाड साहेब उपस्थित होते.
Comments
Post a Comment