येवल्यातील व्यापारी गटाचे भरत समदडीया व हमाल मापारी गटाचे अर्जुन ढमाले यांचा छगन भुजबळ यांच्या शेतकरी विकास पॅनला पाठींबा
व्यापारी गटाचे भरत समदडीया व हमाल मापारी गटाचे अर्जुन ढमाले यांच्याकडून छगन भुजबळ यांच्याकडे पाठींबा पत्र सुपूर्त
नाशिक:-(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी उपमुख्यमंत्री येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत अपक्ष निवडून आलेले व्यापारी गटाचे उमेदवार भरत समदडीया व हमाल मापारी गटाचे उमेदवार अर्जुन ढमाले यांनी आज छगन भुजबळ यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेऊन छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलला पाठींबा देत असल्याचे पत्र दिले. यावेळी छगन भुजबळ यांनी दोनही उमेदवारांचे स्वागत करून त्यांना पुष्पगुच्छ देत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांनी दिलेल्या संमती पत्रात म्हटले आहे की, आम्ही येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेलो आहोत. भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने मोठ यश संपादन केल आहे. येवल्याच्या विकासाठी छगन भुजबळ यांचे योगदान अतिशय महत्वाचे असून कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आम्ही पाठींबा देत असल्याचे म्हटले आहे. यावेळी व्यापारी गटाचे उमेदवार भरत समदडीया, हमाल मापारी गटाचे उमेदवार अर्जुन ढमाले, सुरज पटणी, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, नवनाथ काळे, मकरंद सोनवणे, मुश्रीफ शहा, भाऊसाहेब धनवटे, सतीशशेट समदडीया, प्रणव समदडीया, कुलदीप परदेशी, पंकज भांबारे, केदू गोरे, संदीप लहरे, बाळासाहेब शिंदे, दत्तू कोटमे, केशव अकोलकर, बाबासाहेब काळे, शांताराम कोटमे, संदीप उगले, जनार्दन जानराव, शरद तांदळे, संदीप ढमाले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment