आधार पॅंन कार्ड लिंक दंड कमी करण्यात यावा,आम आदमी पार्टीचे निवेदन
नाशिक: आम आदमी पार्टी नाशिकच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक करण्याची सक्ती केलेली असून सदर पॅन कार्ड हे आधार कार्ड ला लिंक करण्यासाठी प्रति व्यक्ती दंड स्वरूपात एक हजार रुपये आकारले जात असून सर्वसामान्य व गरीब जनतेला विचारात घेता सदर दंड स्वरूपातील रक्कम 50 ते 100 रुपये आकारण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी मार्फत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पाठवण्यात आले. याप्रसंगी आपचे योगेश कापसे, गिरीश उगले पाटील, नवीनदर सिंग आहलुवालिया, स्वप्निल घीया, चंद्रशेखर महानुभाव जगदीश आटवने, सुमित शर्मा.आदीसंह पदाधिकारी
कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment