दृष्टी बाधित विद्यार्थ्यांच्या चिकाटीला माझा सलाम - अँड नितीन ठाकरे
केटीएचएम च्या २७ अंध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान
नाशिक : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) चेन्नई च्या हेल्प द ब्लाइंड फाउंडेशन च्या नाशिक शाखेच्या वतीने केटीएच एम च्या २७ अंध विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मविप्र सरचिटणीस अँड नितीन ठाकरे यांनी अंध विद्यार्थ्यांच्या चिकाटीला सलाम आहे असे म्हंटले तसेच भविष्यात अंध विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ आर डी दरेकर यांनी केले त्यांनी महाविद्यालयात असलेल्या अंध विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा यांची माहिती दिली.हेल्प द ब्लाइंड फाउंडेशन नाशिक शाखेचे समनव्यक विठ्ठल सावकार यांनी संस्थेची माहिती करून दिली. कार्यक्रमासाठी दत्ता कडवे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ तुषार पाटील, आर डी शिंदे, मवाळ सर , धुमने सर, पिंपळके सर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन डॉ तुषार पाटील यांनी केले.
Comments
Post a Comment