धांद्री विविध का सहकारी सोसायटी च्या सभापती पदी बाळासाहेब चव्हाण यांची बिनविरोध निवड
बागलाण : तालुक्यातील धांद्री विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या सभापती पदी बाळासाहेब पोपट चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली
बाळासाहेब चव्हाण यांना दुसऱ्यांदा सभापती होण्याचा बहुमान मिळाला आहे सोसायटीत रोटेशननुसार बाळासाहेब भामरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी दि.२५ मंगळवार रोजी सभापती पदाची निवडणूक होवुन एकमेव अर्ज बाळासाहेब चव्हाण यांचा आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दराडे यांनी कामकाज केले.त्यांनी सभापती पदी बाळासाहेब चव्हाण यांची निवड घोषित केली कामकाजात अहिरे,सचिव,जाधव,यांनी सहकार्य केले.निवड घोषित होताच दराडे यांनी सभापती बाळासाहेब चव्हाण यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.यावेळी पॅनलचे नेते तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजेंद्र चव्हाण, यांनी निवडणूक बिनविरोध पार पाडल्याबद्दल संचालक मंडळ उपस्थितांचे आभार मानत नविन सभापती यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सुत्रसंचलन प्रस्ताविक मुख्याध्यापक प्रशांत चव्हाण, यांनी केले यावेळी गावातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याना पुष्पहार अर्पण करण्यात आले फटाके फोडुन आनंदउत्सव साजरा केला.
यावेळी उपसभापती कारभारी अहिरे,संचालक शिवाजी चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब भामरे, जयश्री पवार, गंगुबाई चव्हाण, राजेंद्र चव्हाण,अशोक चव्हाण, दिपक चव्हाण,राजेंद्र चव्हाण, सोपान चव्हाण,अदिसह विश्वास चव्हाण, आबाजी चव्हाण, आण्णा चव्हाण, प्रकाश चव्हाण, संतोष चव्हाण,नितीन केवळ,सोपान मोरे,बापू अहिरे,बाबाजी चव्हाण, दादा धोंडु, वामण सहादु, केवळ पोपट, सुनिल चव्हाण,संपत चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, राजेंद्र मन्साराम,निवुत्ती चव्हाण, दिलीप चव्हाण, जगदिश चव्हाण, भैय्या चव्हाण, विक्की चव्हाण, अमोल आहेर आदींसह गावकरी उपस्थित होते.
Comments
Post a Comment