१८ अधिकारी/कर्मचा-यांचा सेवापूर्ती निमित्त प्रशासनामार्फत सत्कार

नाशिक : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक महानगरपालिकेच्या दोन उपअभियंत्यांसह विविध विभागातील १८ कर्मचारी ३०एप्रिल २०२३अखेर सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथील सभागृहात त्यांना आज सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. नगर सचिव मदन हरीश्चंद्र, मिळकत व्यवस्थापक जयवंत राऊत यांच्या उपस्थितीत निरोप समारंभ झाला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, रोप देऊन कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. निवृत्त कर्मचा-यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नगर नियोजन विभागातील उप अभियंता उद्धव गांगुर्डे यांनी कार्यकाळातील कामांना उजाळा देताना राजीव गांधी भवन निर्माण होत असतानाच्या आठवणी सांगितल्या. बांधकाम सुरु असताना सुपरव्हिजन केल्याचे सांगितले. यावेळी निवृत्त कमचा-यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. उप अभियंता उद्धव गांगुर्डे, मलनिस्सारण विभागातील उप अभियंता राजेश शिंदे, नाट्यगृह सुपरवायझर बाळासाहेब गिते, नाट्यगृह ऑपरेटर सुनिल कळसकर, घरपट्टी विभागातील लिपीक बापु भोज, वाहनचालक गोरखनाथ केदार, स्टाफ नर्स ऍलिस कदम, पंप ऑपरेटर राजेंद्र शिरसाठ, पेंटर निवृत्ती खैरनार, स्वच्छता मुकादम अंजना बर्वे, स्वच्छता मुकादम सचिन परमार, सफाई कामगार कुणाल रोकडे, शकुंतला कल्याणी, नरेंद्र गायकवाड, सुगंधा माळेकर, राजेंद्र गलांडे, शिला शिंदे आदी कर्मचारी निवृत्त झाले आहेत. 
सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचा-यांना कामगार कल्याण निधीतून प्रत्येकी 10 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे. जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. कामगार कल्याण विभागातील महेश आटवणे, आनंद भालेराव, राजश्री जैन, आरती मारु, मयुर चारोसकर, रमेश पागे आदी कर्मचा-यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला