इंदिरानगरला दत्तजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन
इंदिरानगर :-परबनगर येथील श्रीगुरुदेव दत्त मंदिरात दत्तकृपा सेवा समितीतर्फे दि. 2 ते 8 डिसेंबर दरम्यान श्रीदत्त जन्मोत्सवानिमित्त दत्तयाग,दत्त जन्मोत्सव आणि दत्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रौप्यमहोत्सवी वर्षा निमित्त 2 डिसेंबर रोजी दत्तदास महाराज,संविदानंद सरस्वती आणि रामतीर्थ महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होईल.दररोज सायंकाळी सातला मंत्रजागर,दत्त भक्तिगीते,कीर्तन व दत्तगीत मैफली रंगणार असून,पं.अजित कडकडे,संजीव अभ्यंकरआदींच्या मैफली आकर्षण ठरणार आहेत. 8 डिसेंबर रोजी काल्याचे कीर्तन,महाप्रसाद व पालखी मिरवणुकीने सोहळ्याचा समारोप होईल.भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा