इंदिरानगर नगर अंडरपास रुंदीकरणासाठी बंद
इंदिरानगर :- येथील अंडरपास रुंदीकरणासाठी बंद केला असल्याने अंडरपास येथून येणे जाणे करणाऱ्या वाहतुकीचा ताण लेखानगर येथील अंडरपास येथे आला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या असून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.या ठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.इंदिरानगर अंडरपास रुंदीकरणाचे काम साधारणता नऊ ते दहा महिने चालू राहणार असल्याने येथील वाहतुकीचा ताण लेखानगर अंडरपास येथे येणार असल्याने या ठिकाणी दुभाजक टाकावे तसेच जास्त प्रकाशाचे दिवे लावावेत.गतिरोधकावर पांढरे पट्टे मारावे तसेच सांकेतिक फलक लावावे जेणेकरून अपघात होणार नाही याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी अशी मागणी अशोक चव्हाण,जुगेश चड्ढा, पप्पू चौधरी,मंगेश काठे,आदी व्यवसायिकांनी केली आहे.इंदिरानगर येथील बोगदा बंद केल्याने लेखानगर येथील वाहतुकीवर तानाला या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास आपापसात हाणा मारीचे प्रकारही घडले आहेत.अशोक चव्हाण व्यावसायिक यांनी याबाबत प्रतिक्रिया देत याठिकाणी वाहतूक खोळंब्यात एक रुग्णवाहिका अडकली होती.प्रसिध्दी प्रमुख शी बोलताना सांगितले.या वाहतुकीचा ताण इंदिरा नगरातील अंतर्गत रस्त्यांवर पडला आहे इंदिरानगर अंडर पास वाहतुकीस बंद केल्याने साईनाथ नगर चौफुली आणि कलानगर सिग्नल परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी वाढली आहे.या ठिकाणीही काल सायंकाळी वाहतुकीचा गोंधळ झाला.सिग्नल यंत्रणा अस्तित्वात असली तरी,पोलिस कर्मचारी नसल्यामुळे अनेक वाहनचालक सिग्नलचे नियम धाब्यावर बसवून सुसाट वाहने पळवतात.वाहतुकीच्या या वाढत्या अव्यवस्थेमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून,त्यांनी शहर वाहतूक विभागाच्या वतीने या दोन्ही सिग्नलवर नियमित पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे.साईनाथ नगर चौफुली हा वाहतुकीचा केंद्रबिंदू आहे.या चौफुली जवळून मुंबई आग्रा,पुणे महामार्ग, वडाळा नाका आणि शहरात जाण्याचा मुख्य रस्त्यांचा संगम होत असल्याने या ठिकाणी दिवसभर वाहनांची प्रचंड वर्दळ असते.लहान-मोठे अपघातही होत आहे.त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा