न्यू मराठा हायस्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा
न्यू मराठा हायस्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा करतांना उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थी आदी
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू मराठा हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे, जेष्ठ शिक्षक उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रम इयत्ता नववी ब या वर्गाने सादर करत विद्यार्थी मनोगत श्रध्दा कुलकर्णी,अनुष्का कदम,यांनी तर प्रश्नमंजुषा वेदिका पाटील,अंजली गुरुळे यांनी केले.शिक्षक मनोगतातून आरती पवार यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवनकार्य सांगितले.अध्यक्षीय मनोगतातून ज्ञानेश्वर शिंदे,यांनी पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारतातील एक वसाहतविरोधी राष्ट्रवादी, धर्मनिरपेक्ष मानवतावादी, सामाजिक लोकशाहीवादी आणि लेखक होते. नेहरू हे २० व्या शतकाच्या मध्यभागी भारतातील मध्यवर्ती व्यक्ती होते. ते १९३० आणि १९४० च्या दशकात भारतीय राष्ट्रवादी चळवळीचे प्रमुख नेते होते. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी १६ वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले.नेहरूंनी १९५० च्या दशकात संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार केला आणि आधुनिक राष्ट्र म्हणून भारताच्या प्रतिमेवर जोरदार प्रभाव पाडला. आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये त्यांनी भारताला शीतयुद्धाच्या दोन गटांपासून मुक्त केले हे सांगितले.कार्यक्रमाचे सुंदर फलक लेखन रुपाली शेडगे,मोनिका वडजे, व विद्यार्थी मौर्य गायकवाड,यांनी केले.सुत्रसंचलन अनुष्का देवरे,तेजल निकम,व आभार वेदांगी सोनवणे,हिने मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा