इंदिरानगर येथे पाणी प्लास्टिक व कचरा व्यवस्थापन जनजागृती अभियान


इंदिरानगर :-पाणी,प्लास्टिक व कचरा व्यवस्थापन जनजागृती अभियान परिसरात राबविण्यात आले.येथील स्वामी विवेकानंद शाळा,फडके परिसर,श्रीराम उद्यान रोडवर,वृक्ष मित्रांनी श्रमदान केले.दरम्यान वृक्ष सेवेत झाडांवरच्या वेली काढणे,गवत काढणे, झाडांच्या भोवती आळी करणे,पाण्याची टाकी भरणे व परिसर स्वच्छता करून प्लास्टिक संकलित करण्यात आले.यावेळी सोनचाफा,जास्वंदी शोभेची झाडे लावण्यात आली.ओंकार शौचे,यांनी घरगुती कचरा व्यवस्थापना विषयी मार्गदर्शन केले.जवळच असलेल्या साती आसरा माता मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली.प्रसंगी पर्यावरण प्रेमीं उपस्थित होते.दुसऱ्या व चौथ्या बुधवारी सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान मोदकेश्वर मंदिर येथे स्वच्छ व कोरडे केलेले प्लास्टिक व काचा व्यवस्थित पॅकिंग सह रिसायकलिंग साठी संकलित करण्यात येतात.सर्वांनी या कामी सहकार्य व सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी