त्रंबकेश्वर येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र प्रभाग क्र.१ ब बिनविरोध


त्र्यंबक :- नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)‘बारामती पॅटर्न’नुसार एकत्र येत लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दोन्ही गटांनी परस्परांना पाठिंबा देत सामूहिक रणनीती आखली असून स्थानिक स्वराज्य संस्थेत एकजूट दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.प्रभाग क्र. 1 (ब)  बिनविरोध निवड शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांची भाची मंजूषा रवींद्र वरूणसे,यांची प्रभाग क्र.1(ब) मधून बिनविरोध निवड झाली आहे.या बिनविरोध निवडीसाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी परस्पर सहकार्य करत एकता दाखवली. त्र्यंबक नगरपरिषदेत राष्ट्रवादीच्या एकजुटीचे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.बिनविरोध निवड शक्य करण्यासाठी योगदान देणारे मान्यवर बिनविरोध निवड निश्चित करण्यासाठी खालील नेत्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न व समन्वय साधला,आमदार हिरामण खोसकर,पुरुषोत्तम कडलग विष्णूपंत म्हैसधुने,संपत सकाळे,सुरेश गंगापुत्र,रवींद्र वरुणसे,बहिरू मुलाने या सर्वांच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रवादी पक्षाची संघटित ताकद आणि एकदिलाने काम करण्याची तयारी अधोरेखित झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी