नाशिक ग्रामीण पोलिसांनी दरोडा खुनाच्या प्रयत्नातील दोघांना घेतले ताब्यात
(प्रतिनिधी समाधान रमेश शिरसाठ)
नाशिक :- नाशिक तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील दाखल दरोडा व खुनाचा प्रयत्न गुन्हयातील मुख्य आरोपी व नाशिक जिल्ह्यातून तडीपार असलेले दोन सराईत आरोपी जेरबंद नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दि.१३/११/२०२५ रोजी रात्रीचे सुमारास चारचाकी व मोटार सायकल वर आलेल्या अज्ञात ०८ आरोपींनी संगनमत करून गिरणारे येथे फिर्यादीचे गाडीला डॅश मारून चॉपरचा धाक दाखवून/ पैशाची मागणी करून अंगावर गाडी घातली व पोलीस अंमलदाराचे अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला व मुंगसरे रोडवरील किनारा हॉटेल येथे जेवणाचे बिलावरून वाद करून तेथे हॉटेलची तोडफोड करून पार्किंग मधील चारचाकी वाहनांचे काचा फोडल्या बाबत नाशिक तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.न. १९०/२०२५ भा. न्या. सं.१०९, ,३१०(२),३५१(२),३५२,३२४(४)प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हे गुन्हा घडल्यापासून फरार होते.त्याअनुषंगाने नमूद गुन्ह्याचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने गुप्त बातमीनुसार आरोपीत नामे गणेश रतन सोनवणे,२)अभिजीत अनिल वाघ,रा. मखमलाबाद शिवार,ता.जि.नाशिक येथे शिताफीने ताब्यात घेऊन,त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी व त्यांचे इतर साथीदारांनी मिळून वरील गुन्हा केल्याची कबूली दिली आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटिल,अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र मगर,स्थानिक गुन्हे शाखा, तसेच पोलीस अंमलदार प्रविण काकड,संतोष दोंदे,नवनाथ शिरोळे,रावसाहेब कांबळे,यांनी केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा