राजे छत्रपती उत्तर महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा संपन्न धुळ्याचा रितिक राजपूत ठरला उपविजेता
इंदिरानगर :- उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आयोजित राजे छत्रपती उत्तरमहाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अहिल्यानगरचा चेतन रेपाळे,याने धुळ्याचा रितिक राजपूत याचा ५ विरुद्ध ० गुणांनी पराभव करून 'उत्तर महाराष्ट्र केसरी' हा मानाचा किताब पटकावला.विजयानंतर पाथर्डी ग्रामस्थांच्या हस्ते त्याला चांदीची गदा, ५१ हजार रुपये रोख, तसेच सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. उपविजेता रितिक राजपूत,याला २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.तिसरा क्रमांक अहिल्यानगरच्या महेश फुलमाळी,यांनी पटकावला.त्यांना ११ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.या स्पर्धेला भाजप शहराध्यक्ष सुनील केदार,स्वागताध्यक्ष व माजी नगरसेवक सुदाम डेमसे,माजी नगरसेवक सुदाम कोंबडे,भगवान दोंद,पुष्पा आव्हाड,उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष उत्तम दळवी,सोमनाथ बोराडे,प्रा.मधुकर वाघ,नामदेव गवळी,आदींची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी सुनील कोथमिरे,सोनाली नवले,साहेबराव आव्हाड उपस्थित होते.
विविध वजनी गटांतील विजेते ३० किलो - विघ्नेश भगत (इगतपुरी),करण भगत (इगतपुरी).
३५ किलो - सत्यम चौधरी (अहिल्यानगर), रुद्र बटाले (दिंडोरी)
४० किलो - गणेश झनकर (इगतपुरी), ओमकार बिन्नर (सिन्नर)
४५ किलो -विष्णू जाधव (चांदवड), गोरख सातपुते (चांदवड)
५० किलो - बजरंग शिरसाठ (अहिल्यानगर), जयेश सदगीर (अहिल्यानगर)
५५ किलो -जयेश बोराडे (अकोले), श्रावण गायकवाड (नाशिक)
६० किलो - दादासाहेब आचपळे (नाशिक), प्रशांत तनपुरे (अहिल्यानगर)
६५ किलो - पवन डोनर (अहिल्यानगर), सनित म्हसदे (नाशिक)
७० किलो - शुभम लांडगे (अहिल्यानगर), वरुण फुलपगारे (धुळे)
७५ किलो - वैभव तुपे (नाशिक), भाऊसाहेब सदगीर (अकोले)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा