मोबाईल चोरट्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या मुद्देमाल हस्तगत
ना रोड :- मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांतील आरोपीत ताब्यात याबाबत तक्रारदार चित्रा शामराव निकम वय 40 वर्ष धंदा गृहिणी राहणार रामदास स्वामी नगर लाईन नंबर दोन स्वामी सोसायटी प्लॉट नंबर 203 उपनगर नाशिक यांनी दिनांक 21-11-2025 रोजी नाशिक रोड ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस ने प्रवास करण्याकरिता डि वन कोच मध्ये बसत असताना त्यांचा विवो वाय 95 कंपनीचा 13000 रुपयाचा किंमतीचा मोरपंखी रंगाचा मोबाईल त्यात जिओ सिम असलेला कोणीतरी अज्ञात इस्मानी चोरून नेला म्हणून दि. 21-11-2025 रोजी रेल्वे पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे येऊन मोबाईल गाडी कुठे बाबत लेखी फिर्याद दिली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला गु.र.नंबर 227/25 कलम305 सी बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासी अंमलदार 520 शैलेश पाटील,यांच्याकडे देण्यात आला खबर अधिकारी एपीआय नरेंद्र खैरनार,यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रय उफाडे पाटील यांना गुप्त बातमी द्वारा कडून माहिती मिळाली एक काळ जॅकेट घातलेला हाफ पॅन्ट घातलेला ट्रेन वर मोबाईल करणारा इसम मेन गेट जवळ उभा आहे पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील,पोलीस हवालदार राज बच्छाव,आरपीएफ आरक्षक मनीष कुमार,सागर वर्मा,यांच्या मदतीने संशयित इसमास पकडून रेल्वे पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे आणून चौकशी केली असता त्यांनी त्याचे नाव संतोष उर्फ प्रवीण रघुनाथराव काळे,वय वर्ष 40 राहणार साई गेस्ट हाऊस नाशिक रोड मूळ पत्ता पोस्ट सावळी तालुका औरद जिल्हा बिदर कर्नाटक असे सांगितले व सदर चोरी केलेला मोबाईल साई लॉज रूम नंबर 304 वर ठेवलेला असल्याचे कबूल केले त्यावरून सदर गेस्ट हाऊस मध्ये जाऊन दोन पंचांसमक्ष रूमची झडती घेता तेथे वेगवेगळ्या कंपनीचे 14 मोबाईल मिळून आले 2 लाख 18 हजार 999 किमतीचे मोबाईल गुन्ह्यांच्या तपासकामी जप्त करण्यात आले ही कामगिरी लोहमार्ग छत्रपती संभाजी नगर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,उपविभागीय पोलिस अधिकारी मनमाड वसंत भोये, प्रभारी अधिकारी नरेंद्र खैरनार,आर पी एफ इन्स्पेक्टर नविन प्रताप सिंह,यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील,पोलीस हवालदार शैलेश पाटील,आरपीएफ आरक्षक मनीष कुमार सिंग,आरपीएफ आरक्षक सागर वर्मा,यांनी केले दि 21-11-2025 रोजी मा दिवाणी व फौजदारी सत्र न्यायालय नाशिक रोड यांच्या समक्ष अटक करून हजर करण्यात आले असता आरोपी ला तीन दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा