इस्रो भेटीहून परतले मराठा हायस्कूलचे विद्यार्थी


विद्यार्थ्यांना वरिष्ठ शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्याची अनोखी संधी

(प्रतिनिधी समाधान रमेश शिरसाठ)
नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,यांच्या संकल्पनेतून आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा.डॉ.भास्करराव ढोके,यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील मराठा हायस्कूलचे ४० विद्यार्थी व ६ शिक्षक बंगळुरु येथील इस्त्रो संस्थेची भेट घेऊन नुकतेच परतले आहेत.इस्त्रो अंतराळ संशोधन संस्थेला दिलेल्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांशी संवाद साधल्यानंतर विद्यार्थ्यांना वरिष्ठ शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्याची अनोखी संधी मिळाली. 
शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांना सांगितले की,“कुतूहल हे संशोधनाचे पहिले पाऊल आहे. प्रश्न विचारायला कधीही घाबरू नका.”या वाक्याने विद्यार्थ्यांमध्ये अपार ऊर्जा निर्माण झाली.विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळा,नियंत्रण कक्ष,मॉडेल प्रदर्शन यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.अनेक विद्यार्थ्यांनी भविष्यात वैज्ञानिक बनण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.इस्रो या संस्थेने विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात यांनी केले.तसेच इस्रो या वैज्ञानिक सहलीचे समन्वयक म्हणून विज्ञान शिक्षक पांडुरंग करपे,दिपाली चौधरी,सुनील कदम, योगेश खैरनार,जयश्री देवढे,या शिक्षकांनी जबाबदारी पार पडली. 
(विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांना विचारले प्रश्न)
या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची उत्सुकता वाढविणे आणि अंतराळ संशोधनाची प्रत्यक्ष ओळख करून देणे हा होता.भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी उपग्रह प्रक्षेपण, चांद्रयान,रोव्हर तंत्रज्ञान,रॉकेटची रचना,पृथ्वी निरीक्षण,तंत्रज्ञान, मंगळयान तसेच भारताच्या भविष्यातील गगनयान मोहिमांबाबत शास्त्रज्ञांना विविध प्रश्न विचारले.शास्त्रज्ञांनी प्रत्येक प्रश्नाचे संयमाने, उदाहरणांसह आणि प्रेरणादायी पद्धतीने स्पष्टीकरण दिले.
(पालकांनी व्यक्त केले समाधान)
उपक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न करणारे,सर्व सहकार्य करणारे शिक्षक,पालक आणि विद्यार्थी यांची मोठी भूमिका राहिली.हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनावर विज्ञानाचे बीज रोवले असून,ही भेट त्यांच्या भविष्यासाठी मैलाचा दगड ठरल्याचे सर्वांनी नमूद केले.इस्त्रोसंस्थेला भेट देणे ही आनंददायी गोष्ट आहे.त्यातून करियरच्या संधी प्राप्त होतील,असे मनोगत सर्व पालकांनी व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी