मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद
महात्मा फुले समता परिषदेची मागणी सटाणा :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ,आद्यशिक्षिका सावित्रीमाई फुले व राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरु या महामानवांच्या विषयी बदनामी कारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन अ .भा.महात्मा फुले समता परिषद व सत्यशोधक समाज संघाच्या वतीने सटाणा पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी तथा पोलीस निरीक्षक चिलुमूलू रजनीकांत यांना देण्यात आले या प्रसंगी तालुकाध्यक्ष वैभव गांगुर्डे शहराध्यक्ष यशवंत कात्रे सत्यशोधक समाज संघाचे कार्यकर्ते सुदर्शन मुंजवाडकर ,सरपंच भरत पवार ,सागर शेलार ,अनिल पवार ,नाना वनीस ,संदिप पगारे ,व इतर समता सैनिक उपस्थित होते.