Posts

Showing posts from May, 2023

नोकरीसाठी कुठलाही शॉर्टकट नाही -गणेश न्यायदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंदिरानगर

Image
नाशिक - आजचे युग हे स्पर्धेचे आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला इतरांपेक्षा वेगळे करावे लागणार आहे याचा विचार करून प्रयत्न आणि मेहनत घेऊनच यश मिळवता येते याचे भान ठेऊन अभ्यास केला तर यश निश्चित प्राप्त होते. आज नोकरी मिळवायची तर परिक्षेशिवाय पर्याय नसून . असे प्रतिपादन इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गणेश न्हायदे यांनी केले. जाखडी नगर येथील स्वा.वि.दा.सावरकर अभ्यासिका येथे सावरकर जयंती निमित्त अभ्यासिकेतील18 अभ्यासार्थींनी स्पर्धा परिक्षेत यश सपादन केलेल्या विद्यार्थी तसेच परिसरातील 50 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावरअभ्यासिकेचे संस्थापक तथा अध्यक्ष माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे,व्यवस्थापक प्रकाश कुलकर्णी, अँड अमृत फडणवीस आदी उपस्थित होते.गणेश न्हायदे पुढे म्हणाले की, आज कोणीच शिक्षणात परिपुर्ण नाही, दररोज आपण नविन काही शिकत असतो.आज राजकारणची स्थीती पाहीली तर शिक्षण क्षेत्राकडे राजकारण्यांचे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटते. परंतू चंद्रकांत खोडे यांनी अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्...

नाशिक हे ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून देखील विकसित व्हावं – छगन भुजबळ

Image
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन आयोजित ऑटो अॅण्ड लॉजिस्टिक एक्स्पो व फूड फेस्टिवलचा समारोप नाशिक मधील ट्रक टर्मिनलसह वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू – छगन भुजबळ चालक विश्रांती गृहासह इतर प्रश्नांवर देशातील सर्व ट्रान्सपोर्ट चालकांनी एकत्र येऊन आवाज उठविण्याची गरज - छगन भुजबळ नाशिक  :- नाशिक शहराला ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन, सांस्कृतिक महत्व असून नाशिक हे कृषी, शिक्षण, उद्योग, वैद्यकीय हब म्हणून विकसित होत आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये असलेली कृषी बाजार पेठ,ट्रान्सपोर्ट उद्योगाच असलेलं मोठ जाळ आणि रस्त्यासह उपलब्ध पायाभूत सुविधा बघता नाशिक हे येणाऱ्या काळात नाशिक हे ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून देखील विकसित झालं पाहिजे. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.  नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन आयोजित ऑटो अॅण्ड लॉजिस्टिक एक्स्पो व फूड फेस्टिवल समारोप सोहळा आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडला. यावे...

ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांच्या 'नांदगाव ते लंडन' व 'उजेड पेरायचा आहे' या पुस्तकाचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन

Image
कदम कुटुंबीयांची फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची पताका घेऊन वाटचाल याचा विशेष आनंद - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांच्या पुस्तकांतून सामाजिक विचारांची मांडणी - छगन भुजबळ नाशिक :-  छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराजा सयाजीराव गायकवाड, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी  यांच्या विचारांची पताका खांद्यावर घेवून कदम कुटुंब वाटचाल करीत आहेत. या सामाजिक विचारांची मांडणी ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांनी त्यांच्या पुस्तकातून मांडली आहे,असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिकच्या मु.श.औरंगाबादकर सभागृहात नांदगावचे माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांच्या 'नांदगाव ते लंडन' व 'उजेड पेरायचा आहे' या पुस्तकाचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी आयोजित सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कवी फ.मु.शिंदे, त्यांच्या पत्नी साहित्यिका प्रा. लीलाताई शिंदे, माजी आमदार पंकज भुजबळ, अनिल आहेर,जगन्नाथ ध...

ट्रायबल फोरम कोकण विभागीय अध्यक्षपदी विलास वांगड

Image
पालघर : आदिवासी समाजाच्या सामाजिक कार्यात नेहमिच सक्रिय असलेले आप विलास लक्ष्मण वांगड यांची ट्रायबल फोरम कोकण विभागाच्या विभागिय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष अँड. प्रमोद घोडाम यांनी केली आहे. ट्रायबल फोरम हे संघटन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी ,अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मानासाठी तसेच संस्कृतीचे जतन व संवर्धन करुन,सांस्कृतिक घुसखोरी रोखण्यासाठी काम करीत आहे.  वैचारिक व शिस्तबद्ध असलेल्या कँडरबेस ट्रायबल फोरमची निर्मिती झाली असून समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध पातळ्यांवर लढा देत आहे. वैचारिक व शिस्त असलेल्या संघटनमध्ये नियुक्ती झाल्यामुळे कोकण विभागात आनंद व्यक्त केला जात आहे.

लोक निर्माण बहुउद्देशीय संस्थेचा एक अनोखा उपक्रम कर्णबधिर व मतिमंद, मुलांसोबत सामान्य मुलांचा नृत्य अविष्कार

Image
नवीन नाशिक :  कर्णबधिर व मतिमंद मुले ही निसर्गाच्या देण्यावर खेद व्यक्त न करता त्यांचा स्वीकार करत त्यावर कल्पकतेने कशी मात करू शकतात हे या नृत्य कार्यक्रमाने सिद्ध करून दाखवले.राणे नगर राजीव नगर रोड येथील किशोर नगर सभागृह मध्ये नुकताच नृत्य कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन सेलिब्रिटी गेस्ट मिसेस इंडिया इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती मामासाहेब ठाकरे, उपनिरीक्षक वाहतूक शाखा नाशिक धनराज पाटील,अभिनेते विशाल पाटील, डॉ.उल्हास कुटे, शिवसेना विभाग प्रमुख विनोद दळवी ,राष्ट्रवादी काँग्रेस नवीन नाशिक अध्यक्ष मकरंद सोमवंशी, दिग्दर्शक भगवान देवकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र सपकाळे , दिग्दर्शक विजय जाधव, माजी नगरसेविका छाया देवांग, चारुदत्त दीक्षित उपस्थित होते. पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. अतिथी मनोगत सेलिब्रेटी गेस्ट शिल्पी अवस्थी यांनी यावेळी सांगितले की गेल्या दोन महिन्यापासून अध्यक्ष चंदन खरे हे माझ्या संपर्कात होते कठोर परिश्रम करून त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे, कर्णबधिर...

कर्तुत्ववान नेतृत्व हेमलताताई बिडकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Image
आंबेगण : जनसेवेचावसा घेत शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य सेवेची बांधलकी जोपासत 'साधी राहणी उच्च विचारसरणी हे तत्व अंगीकारत कर्तुत्वाच्या बळावर जनमानसात आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या डांगसेवा मंडळाच्या अध्यक्षा म्हणजेच हेमलता विजय बिडकर. काही माणसं कर्तुत्वाने श्रीमंत असता आणि त्यांच्या कर्तुत्वाचा नेतृत्वाचा अभिमान हा जनसामान्यांनाही असतो. समाजाच्या सर्वच घटकांसाठी तळमळीने काम करीत असतांना कुठलाही मोठेपणा न बाळगता जनसामान्यात समरस होवून आपुलकी, आस्था, प्रेम आणि जिव्हाळा जोपासून आपल्यातील दातृत्व सिद्ध करणारी माणस खुप कमी असतात. अशी माणस ही समाजासाठी प्रेरक आणि नेतृत्वाची खरी गरज असतात. अशाच नाशिक जिल्ह्यात आदिवासी भागातील कळवण, सटाणा, सुरगाणा, पेठ, दिंडोरी तालुक्यातील भूमित लाभलेल्या अशाच सर्व समावेशक आणि लोकप्रिय नेतृत्व म्हणजे मा. हेमलता बिडकर आज त्यांच्या ७५ वा वाढदिवसा निमित्त त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाशझोत. घरातच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्याचा वारसा लाभलेला असतांनाही स्वत:चे कर्तुत्व आणि हिंमतीने विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे नाशिक येथील डांगसेवा...

राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीची रामकुंड अहिल्या घाट नियोजन बैठक संपन्न

Image
नाशिक :-  हिंदू धर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव निमित्त बैठक संपन्न.अहिल्यादेवींनी बारा ज्योतिर्लिंगाचे जीर्णोद्धार केले प्रत्येक धार्मिक ठिकाणी मंदिरे बांधली,घाट मांडली, जनावरांसाठी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली बारव, विहिरी जनसामान्यांसाठी बांधून ठेवल्या, मज्जीद,धर्मशाळा, पानवटी तयार केली, इंदूर सारख्या ठिकाणी मावळ प्रांतात राजधानी स्थापन केली महेश्वरीला नर्मदेच्या कडेला घाट आणि मंदिर बांधली चांदवड सारख्या ठिकाणी रंगमहाल , तसेच नासिक जिल्ह्यात संपूर्ण जाण्या येण्यासाठी रस्ते गोरगरिबांसाठी या सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिल्या अशा या महान कर्तुत्वान प्रशासक महिला राजमाता हिंदू धर्म रक्षक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव सोहळा येत्या 31 मे रोजी व 1जून रोजी अहिल्या, घाट रामकुंड, या ठिकाणी साजरा होणार आहे. त्यानिमित्त, अहिल्यादेवींनी बांधलेल्या  घाटावरती काशी विश्वेश्वर मंदिर बांधले त्या घाटावरती काशी विश्वेश्वराची दर्शन घेऊन व अहिल्या राम मंदिराचे दर्शन घेऊन बैठकीत सुरुवात केली यामध्ये सर्व जाती धर्मातील व्यक्तींनी सहभाग नोंदवला. या...

शनिवारी 20 मे रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

Image
नाशिक, दि. १७ मे २०२३ : मनपाचे मुकणे धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथून ३३ के. की वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. सदरचे सबस्टेशन मधील विद्युत विषयक कामे करणे करीता विज वितरण कंपनीमार्फत शनिवार दि. २०/०५/२०२३ रोजी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार नाही. तसेच  मनपाचे गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून मनपाचे शिवाजीनगर, बाराबंगला, पंचवटी, निलगीरीबाग, गांधीनगर, नाशिक रोड या जलशुध्दीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणेत येतो, सदरचे जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभ व वितरण व्यवस्थेतील आवश्यक दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असल्याने गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. सबब सदर दोन्हीही ठिकाणाहून होणारा पाणीपुरवठा दि. २०/०५/२०२३ रोजी बंद ठेवून अनु. क्र. १ व २ मधील नमुद दुरुस्ती कामे करता येणे शक्य होणार आहे. तरी मनपाचे मनपाचे गंगापुर धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन व मुकणे धरण पंपींग स्टेशन येथून संपूर्ण शहरास होणारा *शनिवार दि. २०...

व्यंकटेश को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या मार्फत शिवाजी डोळे यांच्या प्रयत्नातून प्रथमच शेळी मेंढी नाशिक ते दुबई एक्सपोर्ट

Image
नाशिक :- नाशिक जिल्ह्यात व्यंकटेश को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या मार्फत  शिवाजी डोळे यांच्या प्रयत्नातून  प्रथमच शेळी मेंढी पालन नाशिक ते दुबई एक्सपोर्ट करण्यात आले. सकाळी ओझर विमानतळावरनं 1000 शेळी दुबई साठी रवाना झाली. अजूनही 30 हजार शेळी मेंढीची  मागणी आहे. त्यामुळे हा व्यवसाय शेती पूरक असल्याकारणाने सर्व मेंढपाळ बांधवांना या व्यवसायात मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आणि यापुढे मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करण्यावर भर देण्यात येईल असे व्यंकटेश को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या मार्फत सांगण्यात आले आहे. यावेळी शेळी मेंढी पालन करणारे मेंढपाळ बांधव  तसेच सामाजिक कार्यकर्ते ओझर विमानतळावर याप्रसंगी दाखल होते. खासदार विकास महात्मे, शिवाजीराव डोळे, विनायक काळदाते, प्रहार जिल्हा सरचिटणीस  समाधान बागल, मा. तहसीलदार कुवर साहेब, विवेकानंद वाघ, ज्ञानेश्वर ढेपले अण्णासाहेब सपनार, वैभव रोकडे, भूषण जाधव, संदेश मोरे, निंबा जाधव, ज्ञानेश्वर परदेशी, बापू शिंदे,मेंढपाळ बांधव, व्यंकटेश को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सदस्य वर्ग,  तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित ह...

नृत्यांगना गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करावा नाशिक जिल्हा बंदी करावी - अंबादास खैरे शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस

Image
गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करा ; युवक राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध गौतमी पाटीलला जिल्हा बंदी करून तिच्यावर गुन्हा दाखल करा - युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे नाशिक,दि.१६ मे :- नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील उपस्थित मद्यपी तरुणांनी मारहाण केली. या घटनेत पत्रकार गंभीर जखमी झाले आहे. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत असून गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करून तिला नाशिक जिल्हा बंदी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे. नाशिक मधील. या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना येथील मद्यपी युवकांनी मारहाण केली. त्यामुळे यामध्ये पत्रकारांना गंभीर दुखापत झाली. या घटनेसाठी सर्वस्वी गौतमी पाटीलला जबाबदार धरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच नाशिकमध्ये असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी नाशिक जिल्ह्यात गौतमी पाटील...

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचा वरिष्ठ अधिकारी ३० लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आला

Image
नाशिक : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठा मासा पकडला  नाशिक  सतिश भाऊराव खरे , वय 57 वर्ष. पद -जिल्हा उपनिबंधक, सहकरी संस्था नाशिक वर्ग-1 रा. फ्लॅट नंबर 201, आई हाईट्स, कॉलेज रोड, नाशिक. 2) शैलेश सुमातीलाल सभद्रा वय 32 वर्षे धंदा वकील, खाजगी ईसम, रा . फ्लॅट नं 4, उर्वी अपार्टमेंट सौभाग्य नगर, गंगापूर रोड, नाशिक या दोघांना लाच स्वीकारताना पथकाने पकडले लाचेची मागणी- 30,00,000/-₹ दि.15/5/2023 लाच स्वीकारली - 30,लक्ष यातील तक्रारदार हे नुकतेच नाशिक जिल्ह्यातील एका कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये संचालक पदी कायदेशीर पद्धतीने व वैधपणे म्हणून निवडून आले आहेत. त्यांचे निवडी विरुद्ध दाखल झालेल्या प्रकरणावर सुनावणी घेऊन ती सुनावणी तक्रारदार यांच्या बाजूने लावून निर्णय देण्यासाठी यातील लाचखोर क्रमांक 1 यांनी स्वतः तसेच  खाजगी इसम क्र 2 लाचखोर यांनी तक्रारदार यांच्याकडे 30,00,000/- (तीस लाख ) रुपये लाचेची मागणी करून सदर रक्कम  क्र 1 यांनी स्विकारण्याचे मान्य करून क्र 1 यांनी त्यांचे राहते घरी तक्रारदार यांचे...

डेंग्युला हरविण्यासाठी भागीदारी करावी - डॉ. नितीन रावते, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी

Image
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य मलेरिया विभागामार्फत दि. १६/०५/२०२३ रोजी जागतिक डेंग्यु दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मनपाच्या सहाही विभागामध्ये डेंग्यु दिनानिमित्त मलेरिया विभागातील कर्मचारी प्रतिज्ञा घेणार आहे. त्यानंतर मोटारसायकल व्दारे विभागात रॅली काढण्यात येणार आहे. तदनंतर विविध बाजारपेठ, बस स्थानके इत्यादी ठिकाणी खालील प्रमाणे प्रबोधन जनजागृती करण्यात येणार आहे. डेंग्यु हा विषाणुजन्य आजार असुन "एडीस इजिप्टी डास हा आजारासाठीचे प्रसार माध्यम आहे. एडीस इजिप्टी डास चावल्यानंतर साधारणतः आठवडयानंतर व्यक्तीस डेंग्यु आजाराची लागण होते. या आजारात विविध प्रकारची लक्षणे दिसुन येतात- ताप येणे, डोके दुखी, सांधे दुखी, उलटी- मळमळ, शरीरावर लालसर रंगाचे पुरळ चट्टे येणे इत्यादी हा आजार स्त्री / पुरुष लहान मुले कोणालाही होऊ शकतो व वेळेवर निदान आणि उपचार न झालेस या आजारामुळे रुग्णाचा मृत्युही होऊ शकतो.. त्यामुळे ताप आल्यास तो अंगावर न काढता त्वरीत रक्ताची तपासणी करुन घेणे आवश्यक ठरते. डेंगी या आजाराची तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालय व मनपा रुग्णालय येथे...

वृद्ध महिलेसह मुलास मारहाण प्रकरणी येवला तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Image
येवला : पोलीसांनी दिलेली माहिती अशी की अंगुलगाव येथील रहिवासी जिजाबाई गणपत झाल्टे ह्या घराजवळच मागच्या बाजूला जिजाबाई गेल्या असता कुरापत काढून रविंद्र अर्जुन झाल्टे यांने जिजाबाई यांना लाथ मारल्याने त्या खाली पडल्या त्यात त्यांना डोक्याच्या पाठीमागील बाजूस दगडाने दुखापत झाली त्यानंतर शैलेंद्र अर्जुन झाल्टे, तसेच अजुन दोन अशांनी जिजाबाई यांना तसेच त्यांचा मुलगा सुदेश याला मारहाण केली धमकी दिली की आमच्या नादाला लागू नका नाहीतर तुम्हाला संपवून टाकू अशी दमबाजी केली म्हणून जिजाबाई गणपत झाल्टे, यांनी येवला तालुका पोलीसात गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी पोलीस हवालदार हेंबाडे तपास करीत आहेत.

अनुकंपा धारकांना पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

Image
नाशिक : अनुकंपा धारक नाशिक जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी सर्व विभागातील पात्र उमेदवारांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आजपर्यंत एकूण 449 पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र मिळाल्याने उमेदवारांनी आभार मानले.

नाशिक मनपाची अस्वच्छता करणा-या २९ जणांविरोधात कारवाई, १५ दिवसांत सुमारे १ लाखांचा दंड वसुल

Image
नाशिक :- (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार शहरात प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. सातत्याने मनपाच्या सहाही विभागात कारवाई केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-यांविरोधातही कारवाई केली जात आहे. दुसरीकडे मनपाकडून प्लास्टिकचा वापर न करण्याबाबत जनजागृतीही केली जात आहे. नवीन नाशिक विभागीय कार्यालय अंतर्गत आज दि. ९ मे रोजी प्रतिबंधीत प्लास्टिकचा वापर केल्याने एका दुकानदाराला पाच हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच रस्ते मार्गावर घाण केल्यामुळे नऊ केसेसमध्ये १,८०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. अशा एकूण १० केसेसमध्ये आज ६,८०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मनपा घनकचरा विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे यांच्या सुचनेनुसार नवीन नाशिक विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधीत प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत दि.२५.०४.२०२३ ते दि.९.०५.२०२३ या काल...

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पुणे ते इंदोर जाणाऱ्या शौर्य यात्रेचे येवल्यात स्वागत

Image
येवला : महाराजा यशवंतराव होळकर यांची पुणे ते इंदोर शौर यात्रा आज सकाळीच कोपरगाव वरून येवल्यामध्ये जोरदार जंगी स्वागत करण्यात आले त्यामध्ये फटाक्यांची आताजबाजी भंडाऱ्याची उधळण करण्यात आली तसेच नगर मधून नाशिक जिल्ह्यात प्रवेश करताना जिल्हा बॉर्डरवर स्वागत करण्यात आले व ऐतिहासिक भूमी तात्या टोपे यांच्या स्मारकात जाऊन पुष्पहार गुच्छ अर्पण करून घोषणाबाजी करण्यात आली तसेच ओंकारशाचे वंशज स्वप्निल राजे होळकर,सुधीर भाऊ देडगे, विठ्ठल भाऊ कडू,योगेश धरम, यांचा सत्कार करण्यात आला तसेच लक्ष्मण दिवटे यांनी प्रास्ताविका केली व तदनंतर *महाराजा यशवंतराव होळकर व अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर गणेश भाऊ निंबाळकर यांचे अतिशय धडककेबाज व सुंदर अशी व्याख्यान झाले त्यामध्ये त्यांनी सांगितले की यशवंतरावांचा आणि अहिल्यादेवींचा चांदवड तसेच येवला नाशिक जिल्ह्यासाठी काय योगदान आहे व संपूर्ण भारतासाठी त्यांनी काय काय योगदान दिले व त्यांच्या चरित्रावरती पूर्ण पणे प्रकाश टाकण्यात आला चांदवडच्या रंगमहालाचा काय पलट होण्यासाठी सर्व समाजातील समाज बांधवांनी एकत्र येऊन यापूर्वी महापुरुषांचा...

शालिमार येथील अनधिकृत २४ पत्र्यांची दुकाने हटविली, वाहतुकीतला मोठा अडथळा दूर

Image
नाशिक : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक महानगरपालिका पश्चिम विभागीय कार्यालय अंतर्गत शालिमार येथे आज दि. ४ मे रोजी २४ अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्यात आली. शहरातील महत्त्वाच्या मार्गावरील अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमण काढण्याचा आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिला आहे. त्यानुसार उपआयुक्त (अतिक्रमण) करुणा डहाळे यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त मदन हरिश्चंद्र, पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. गेल्या २६ वर्षांपासुन वाहतुकीस अडथळा ठरणारे शालिमार भागातील कब्रस्तानला लागून असलेल्या अनधिकृत २४ पत्र्यांची दुकाने अतिक्रमण पथकामार्फत हटविण्यात आली आहेत. अतिक्रमण विरोधी पथकाने दोन जेसीबींच्या सहाय्याने कारवाई करत अऩधिकृत दुकाने जमिनदोस्त केली आहेत.  मनपा प्रशासनाने सर्व गाळेधारकांना सूचना दिली होती. कब्रस्तान जागेच्या लगत आठ ते दहा गाळे झोपडपट्टी विभागात होते. त्या ठिकाणच्या पक्या बांधकामातील व्यावसायिक वापराचा भाग मनपाने तोडला आहे. प्रत्यक्ष शालीमारचा परिसर हा गेल्या काही वर्षात अतिक...

धांद्री माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन

Image
सटाणा: धांद्री येथे १ मे महाराष्ट्र दिन कामगार दिनानिमित्त माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक प्रशांत चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी अहिरे सर निलेश पवार विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.

खते, बि-बियाणे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा – पालकमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत बियाण्यांचा काळा बाजार, खतांची भेसळ रोखण्याच्या सूचना गडचिरोली :-  दि.02 :   खरीप हंगामापूर्वी  जिल्ह्यात खते व बियाण्यांचा मुबलक साठा जरी असला तरी तो शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. ते गडचिरोली येथे खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत बोलत होते. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी संजय मीणा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी सादरीकरण केल्यानंतर ते उपस्थितांना उद्देशून बोलत होते. शेतकऱ्यांच्या धावपळीच्या मौसमात अनेक खते व बियाण्यांचे पुरवठादार फसवणूक करतात. यातील काळाबाजार व भेसळ रोखण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पुरवठादारांची बैठक घेऊन याबाबत त्यांना स्पष्ट सूचना देऊन काळाबाजार करणाऱ्या पुरवठादारांचे परवाने कायमस्वरूपी बंद करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, पोलीस उपमहानिरीक्...

वाचकांच्या हृदयाला साद घालते ती यशस्वी कविता :- संजय वाघ. स्मिता देशपांडे यांच्या स्वच्छंद काव्यसंग्रहाचे झाले प्रकाशन

Image
नाशिक सिडको - कवीने शब्दबद्ध केलेल्या भाव-भावना कवितेच्या माध्यमातून जेव्हा वाचकांच्या हृदयाला साद घालतात, त्यांना त्या कविता आपल्याशा वाटतात तेव्हा ती कविता यशस्वी झाल्याचे अधोरेखित होते, असे प्रतिपादन साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार विजेते संजय वाघ यांनी केले. इंदिरानगर येथील चार्वाक चौकातील बल्लाळ संकुलात सौ. स्मिता गुरुप्रसाद देशपांडे यांच्या ‘स्वच्छंद ’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका सुरेखा बोऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी वाघ अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. व्यासपीठावर कवयित्री स्मिता देशपांडे, अविनाश बल्हाळ, दिलीप बल्लाळ व सुहास अंजनकर आदी उपस्थित होते. वाघ पुढे म्हणाले, देशपांडे यांच्या संग्रहातील बहुतांशी कवितांमध्ये ‘तो आणि ती’च्या नातेसंदर्भातील प्रेम, विरह, आसक्ती, श्रावण, संगीत व मनातले गाव आदी विषय अगदी तरल व उत्कटतेने अभिव्यक्त झाले असून ही कविता स्वतंत्र अशी शैली घेऊन साकारल्यामुळे ती वाचकाला आपलीशी वाटते. बोऱ्हाडे यांनीही संग्रहाच्या मुखपृष्ठासह वेगवेगळ्या विषयांवर बेतलेल्या कवितांचे कौतुक केले.याप्रसंगी शरदिनी देशपांडे, ...