Posts

Showing posts from September, 2019

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) व्यसनमुक्ती वर प्रकाशझोत टाकणारा चित्रपट सरकारमान्य येत्या २७ तारखेला प्रदशित

Image
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) प्रतीनीधी - श्रीराम क्रिएशन्स पुणे निर्मित चित्रपट सरकारमान्य दिनांक २७-०९-२०१९ ला  प्रदशित दिनांक २४-०९-२०१९ सरकारमान्य दारु दुकानाच्या भोवती व व्यसनमुक्ती च्या विषयावर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट आपल्या देशात महाराष्ट्रात स्त्री शिक्षण व स्वातंत्र्य साठी आपले आयुष्य खर्ची घालणारे सर्वच महामानवांना वंदन तथापि दुर्दैवाने एक वेगळेच ताट आपल्यापुढे वाढुन ठेवलेले आहे. आपल्या आजूबाजूला सरकारमान्य दारु या भयानक दैत्याने थैमान मांडले आहे. व त्याला शासनाची साथ मिळाली आहे. त्याच्यामुळेच संसार उध्वस्त होत आहे तेव्हा यांच्यावर एकच उपाय म्हणजे शासनमान्य असो अथवा खाजगी असो या विनाशक पदार्थांवर संपूर्ण पणे समाजाकडून बहिष्कार टाकला गेला पाहिजे तरच आपण जिवनात यशस्वी होऊ व्यसनमुक्ती दारुबंदी अमली.पदार्थ यामुळे होणाऱ्या दुष्परिणाम यावर प्रकाशझोत टाकणारा चित्रपट म्हणजे ( सरकारमान्य) निर्माती ,कथा,पटकथा, रवींद्र होनराव, दिग्दर्शक , अशोक झगडे कलाकार, सिकंदर मुलानी, सुवर्णा माने, अकुंश मांडेकर,पंकज तौर,जान्हवी पाटील, प्रदीप पानसरे,पुनम कापसे, सोनल गोरखे,सारंग मालसे...

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक मधे पुन्हा आणुया आपले सरकार चे केले आवाहन

Image
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) प्रतिनिधी - करणसिंग पवार - नाशिक  दिनांक १९ - ०९ -  २०१९ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला नवी दिशा दिली, पुन्हा आणूया आपले सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यातील जनतेला आवाहन महाराष्ट्रात यापूर्वी राजकीय अस्थिरतेमुळे हे राज्य आपल्या क्षमतेनुसार गतीने विकसीत झाले नाही. पण गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण बहुमत नसतानाही स्थिर, प्रगतीशिल आणि राज्याला समर्पित सरकार चालवून महाराष्ट्राला नवी दिशा दिली आहे. आता महाराष्ट्रातील जनतेची जबाबदारी आहे की,  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राजकीय स्थैर्याचा फायदा उठवला पाहिजे. “चला पुन्हा आणूया आपले सरकार,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  नाशिकमध्ये जाहीर सभेत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यव्यापी महाजनादेश यात्रेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधान बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपा माज...

साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख - भाजप माध्यम विभाग कार्यशाळा

Image
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) मुंबई, १४ सप्टेंबर २०१९ विधानसभा निवडणुकीत आपल्या सरकारची कामगिरी प्रभावीपणे मांडा उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माध्यम विभागाला सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी महायुती सरकारच्या पाच वर्षांच्या कामगिरीच्या आधारावर महायुती आगामी विधानसभा निवडणूक जिंकणार असून आपल्या सरकारची कामगिरी प्रभावीपणे मांडा, असे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी मुंबईत सांगितले.भाजपा, महाराष्ट्र प्रदेश माध्यम विभागाने आयोजित केलेल्या एक दिवसाच्या कार्यशाळेचे उद्घाटन  तावडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आणि सहमुख्य प्रवक्ते व माध्यमविभाग प्रमुख केशव उपाध्ये उपस्थित होते. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते, पॅनेलिस्ट, आणि सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी कार्यशाळेस उपस्थित होते विनोद तावडे म्हणाले की, आपल्या राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात खूप कामे केली आहेत. या कामांच्या आधारावर सकारात्मक मतांच्या जोरावर भाजपा महायुती आगामी निवडणूक जिंकणार आहे. विरोधक निष्प्रभ झाल...

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) आनंदवली मंडलिकांचा गणेश आरती

Image
साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ०८/०९/२०१९आपलं मित्र मंडळ प्रणित मंडलिकांच्या श्रीमंत चांदीच्या गणपती बाप्पाची आरती आनंदवल्ली गावातील  डाॅक्टर राहुल भोसले व  डाॅक्टर ललित जाधव यांनी सहपत्नी उपस्थितीत  केली. यावेळी मंडळ्याच्या पदाधिकारीं सह परिसरातील नागरिक व राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष चे ग्रामीण युवक अध्यक्ष सनिल पगारे,अनिल शिंदे, आदी उपस्थित.

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) मालेगाव वरीष्ठ पोलीस आधिकारींंनी घेतला बंदोबस्त चा आढावा

Image
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख )मालेगाव शहरात दिनांक १०/०९/२०१९ रोजी होणारे मोहरम ताजीया सवारी मिरवणूक व दि .१२/०९/२१९ रोजी होणारे गणेश विसर्जन मिरवणूकच्या अनुषंगाने ०७/०९/२०१९ रोजी मालेगाव शहरात मोहरम व गणेश विसर्जन मार्गाची तसेच गणेश विसर्जन स्थळाची पहाणी विशेष पोलीस महानिरीक्षक  छोरिगं दोरजे व पोलीस अधिक्षक डॉ .आरती सिंह  यांनी पहाणी केली. तसेच मिरवणूक मार्गात असणारे इलेक्ट्रीक तारा रस्त्यात असलेले खड्डे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व मनपा अधिकारी यांना मार्गावरील अडचणी दुर  करण्याच्या सुचना दिल्या.बंदोबस्ताचा आढावा घेतला. दोन्हीही मिरवणूकीसाठी चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. यावेळी अपर पोलीस अधिक्षक मालेगाव सर्व उप उभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) मंडलिकांचा मानाचे गणपतीची आरती

Image
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) दि. ०७/०९/२०१९ आपल मित्र मंडळ प्रणीत मंडलिकांचा श्रीमंत चांदीच्या गणपतीची आरती शिवसेना गटनेते विलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मा.सभापती सातपुर उषाताई बेंडकोळी, रमेश गायकवाड, शंतनु शिंदे ,भास्कर जेजुरकर, गिरीश बच्छाव, जिभाऊ आहीरे ,विलास आहेर, देवा जाधव ,किसन मंडलिक ,शरद मंडलिक, निगळ,सोमनाथ मंडलिक, प्रकाश मंडलिक, आदी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवेदन

Image
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) दि. ०७/०९/२०१९ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील गडकिल्ले संरक्षण मागणीसाठी जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील २५ किल्ले पर्यटन विकासाच्या नावाखाली भाड्याने देण्याच्या निर्णय रद्द करण्यात यावा. अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी गिरीश अकोलकर बाळासाहेब साळवे राजश्री वानखेडे. ग्रामीण युवा अध्यक्ष सनील पगारे रेश्मा बच्छाव अशोक बच्छाव उपस्थित होते.

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) ग्रंथालयांना नुतनीकरण करीता निधी मिळणार

Image
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) मुंबई, दि. ०७/०९/२०१९: भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी योजनेअंतर्गत 'इमारत बांधकाम/ विस्तार व नुतनीकरण' या योजनेसाठी राज्यातील शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान देण्यात येते. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या सहकार्याने शासकीय सार्वजनिक ग्रंथालयांना कार्यान्वीत करण्यासाठी समान निधी तसेच सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत विस्तार-बांधणीसाठी अर्थसहाय्य योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत इच्छुकांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 16 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, अधिक माहितीसाठी संकेतस्थळ www.rrrlf.nic.in वर संपर्क करण्याचे आवाहन ग्रंथालय संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) औरंगाबाद सक्षम महीला राज्यस्तरीय मेळावा

Image
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महीला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचे बचतगटाच्या माध्यमातून केलेल्या कामाचे कौतुक केले ( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) दिनांक ०७/०९/२०१९ महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई मध्ये विकास कामांच उद्घाटन केल्यानंतर औरंगाबाद लाही राज्यस्तरीय सक्षम महीला मेळाव्या प्रसंगी बोलतांना महीला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंचे  महीला बचतगटाच्या माध्यमातून महीलांचा विकास साधल्याबद्दल कौतुक केले.यावेळी पंकजा मुंडे यांनी राज्यभरातील बचत गटांच्या कामांचा आढावा घेतला. राज्यात ४ लाख ५ हजार बचतगट झाले आहेत. वबचत गटांची उत्पादन परदेशातही जातात यानिमित्ताने महीला बचत गटातील सदस्य परदेशी बाजार पेठे तही पोहचले. महीलांच्या कौशल्य विकासवर भर दिल्यामुळे त्या स्वंयपुर्ण झाल्य असे पंकजा मुंडे म्हणाल्या. या कार्यक्रम प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यशस्वी मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला.

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) गडकिल्ले संदर्भात जयकुमार रावल यांचे स्पष्टीकरण

Image
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) ऐतिहासिक किल्ल्यांचा हॉटेलिंगसाठी वापर ही बातमी चुकीची मुंबई, दि.०६/०९/२०१९ राज्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि छत्रपती शिवरायांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या किल्ल्यांचा वापर हॉटेलिंग किंवा लग्न समारंभासाठी होणार असल्याच्या बातम्या पूर्णत: निराधार आणि खोट्या आहेत, असे स्पष्टीकरण राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. शासनाने राज्यातील अत्यंत दुर्लक्षित असलेल्या किंवा पडझड होत असलेल्या वर्ग 2 दर्जाच्या किल्ल्यांचा हेरीटेज विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. गावागावात असलेल्या या किल्ल्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. आधीच्या सरकारच्या काळात या किल्ल्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. आता वर्ग 2 दर्जाच्या या किल्ल्यांची देखभाल – दुरुस्ती, जतन-संवर्धन व त्यांचा पर्यटनदृष्ट्या हेरीटेज विकास करण्यासाठी धोरण आखण्यात आले आहे. पण या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावत राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांचे हेरीटेज हॉटेल किंवा लग्न कार्यालयामध्ये रुपांतरण करण्यात येणार असल्याच्या चुकीच्या बातम्या ...

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) मदान हे महाराष्ट्र चे नवीन निवडणूक आयुक्त

Image
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) दिनांक ०५/०९/२०१९ राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार यू. पी. एस. मदान यांनी स्वीकारला मुंबई, दि. 5 : राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला असून मा.राज्यपाल यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. मदान 1983 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाले होते. राज्याच्या मुख्य सचिवपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे. तत्पूर्वी त्यांनी राज्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणून सेवा बजावली. त्याचबरोबर त्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे. मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी मदान यांचे स्वागत केले. आयोगातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ज.स.सहारिया यांचा राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने मदान...

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) अनुसूचित जमाती समीतीचे रामचंद्र सोनकवडे यांच्यावर लाच प्रकरणी गुन्हा दाखल

Image
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) ०५/०९/२०१९नाशिक चे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समीती उपसंचालक रामचंद्र सोनकवडे व विधी अधिकारी वर्ग -१ शिवप्रसाद मुकुंदराव काकडे यांच्या वतीने लाचेची रक्कम स्विकारतांना आढळल्याने सर्व अटकेत अनुसूचित जमाती प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी म्हणुन दिनांक ०४/०९/२०१९ रोजी शिर्डी येथील हाटेल साई आ सरा येथे पाच लाख रुपये लाच स्विकारतांना खालील प्रमाणे आरोपींना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांनी  ताब्यात घेतले शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी १)रामचंद्र रतीलाल सोनकवडे उपसंचालक वर्ग - १ अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समीती नाशिक. २)शिवप्रसाद मुकुंदराव काकडे विधी अधिकारी वर्ग - १ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समीती नाशिक राहणार बडदे नगर सिडको नाशिक. ३)विनायक - उर्फ सचीन उत्तमराव महाजन बडदे नगर सिडको ४)मच्छिंद्र मारुती गायकवाड अहमदनगर यांना ताब्यात घेतले.

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) लाचखोर जनार्दन वाघ ए सि बी च्या जाळ्यात

Image
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) ग्रामविकास अधिकारी जनार्दन कचरु वाघ १५ हजार लाच स्विकारतांना अटकेत ( प्रतिनिधी कृष्णा शिरसाठ ) दिनांक ०५/०९/२०१९ आपल्या मुलाच्या सैनिक स्कुल सातारा येथे अँडमिशन कामी आवश्यक असलेला ग्रामसेवक नागडे गाव येथिल रहिवासी दाखला देण्यासाठी व तहसिल कार्यालय प्रांत कार्यालय येवला येथुन जात प्रमाणपत्र व डोमोशियल त्वरित काढुन देण्यासाठी दि. ०३/०९/२०१९ रोजी ग्रामविकास अधिकारी जनार्दन कचरु वाघ नागडे गाव ता. येवला जि. नाशिक यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवण्यात आले लाचलुचपत विभाग नाशिक यांनी साफळा लावत  येवला बसस्थानक परिसरातील साईनाथ चहाच्या टपरीवर पंचासमक्ष रुपये १५ हजार स्विकारल्याने रंगेहाथ पकडण्यात आले.

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) भाजप ईच्छुकांच्या मुलाखती

Image
प्रतिनीधी ( करणसिंग पवार) विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  नाशिक पूर्व, नाशिक मध्य व नाशिक पश्चिम  भाजपा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न. नाशिक : दि.04 सप्टेंबर 2019 भाजपा वसंतस्मृती कार्यालय, नाशिक येथे भाजपातर्फे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती नगरविकास राज्यमंत्री तथा नाशिक विधानसभा निरीक्षक ना.योगश सागर यांच्या उपस्थितीत संपन्न झाल्या. केंद्र व राज्य सरकारच्या उत्तुंग कामगिरीमुळे प्रत्येक विधानसभा मतदार संघात अनेकजण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.  अशी माहिती शहराध्यक्ष गिरीष पालवे यांनी दिली.           तत्पूर्वी कोअर कमिटीची बैठक नगरविकास राज्यमंत्री तथा नाशिक विधानसभा निरीक्षक ना.योगश सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीसप्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनिल बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीष पालवे,संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सरचिटणीस पवन भगुरकर,काशिनाथ शिलेदार, उत्तमराव उगले,संभाजी मोरुस्कर, आ.बाळासाहेब सानप, आ.सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, सभागृह नेता स...

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) राज्यपाल स्वागत

Image
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) नवनियुक्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत राजभवनात राष्ट्रीय सलामीच्या मानवंदनेसह स्वागत मुंबई, दि. ०४/०९/२०१९ नवनियुक्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल कोश्यारी यांचे खास विमानाने आगमन झाले. त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर राजभवन येथे पोलीस पथकाने राष्ट्रीय सलामीच्या मानवंदनेसह  कोश्यारी यांचे स्वागत केले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज्यपाल कोश्यारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, राज्यपालांचे सचिव वेणू गोपाल रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.

साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख

Image
साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख दिनांक ०१/०९/२०१९  ( प्रतिनिधी - कृष्णा शिरसाठ) “गणेशोत्सवासाठी स्मार्ट रोड खुला प्रतिष्ठापना व मिरवणूक पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक म्युनिसीपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत होत असलेल्या स्मार्ट रोडची (दि. 31/08/2019) रोजी पाहणी केली. यावेळी  नाशिक म्युनिसीपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, जीएम सिव्हील विश्राम पाटील, नगररचनाकार कांचन बोधले उपस्थित होते. गणेशोत्वाच्या मिरवणुकीसाठी स्मार्ट रोड खुला होणार असून त्याची पाहणी आज मनपा आयुक्तांनी केली. दरम्यान मिरवणुकीचा मार्ग मेहेर सिग्नल ते अशोक स्तंभ दरम्यान स्मार्ट रोड मिरवणुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या मार्गावरील कामं अंतिम टप्प्यात आहेत. त्याचबरोबर त्र्यंबकनाका ते अशोक स्तंभ येथे आयुक्तांनी स्मार्ट रोडची पाहणी केली. या दरम्यानच्या रस्त्यामधील कामामध्ये काही सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित असलेल्या अभियंते आणि ठेकेदारांना केल्या. स्मार्ट रोडचे काम लवकरात लवकर मार्गी लागून नागरिकांसाठी...

साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख

Image
साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख (प्रतिनिधी - करणसिंग पवार)दिनांक ०१/०९/२०१९ नाशिक महानगरपालिका सेवानिवृत्त सोहळा संपन्न  नाशिक महानगरपालिकेतील कायम सेवेत असलेले विविध संवर्गातील  अधिकारी  कर्मचार्यांचा ३१/०८/२०१९ रोजी  सेवापूर्ती सोहळा सत्कार समारंभ  महापौर, रंजना भानसी  उपमहापौर,प्रथमेश गिते सभागृह नेते, सतीश सोनवणे स्थायी समिती सभापती उध्दव निमसे यांच्या उपस्थिती त करण्यात आला. सेवापुर्ती सत्कार,समारंभ प्रसंगी, उपआयुक्त सोनवणे, आयुक्त (प्रशासन) घोडे पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोपीनाथ हिवाळे व मधुकर झेंडे यांनी केले.  महापौर रंजना भानसी यांनी सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना सेवा निवृती नंतरचे आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्याच प्रमाणे,  गोपीनाथ हिवाळे यांनी मान्यवरांचे व सेवापुर्ती सत्कारार्थींचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.  राजेंद्र रामगीर गोसावी विभागीय अधिकारी सातपूर विश्वास नाना दोडके वरीष्ठ लिपीक कैलास त्र्यंबक वाबळे बोअर अटेन्डन्ट विनोद केशव कुलकर्णी पाईप लाईन फिटर राजेंद्र लक्ष्मण दे...

साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख

Image
नाशिक ग्रामीण पोलिस दलातील कर्मचारी सेवानिवृत्त दिनांक - ०१/०९/२०१९  साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख (प्रतिनिधी समीर वेलदे) नाशिक ग्रामीण पोलीस दलातुन पोलिस उपनिरीक्षक रमेश मानकर साह्ययक उपनिरीक्षक सुदाम सुर्यवंशी सहा.पो उपनिरीक्षक नानाजी मुठेकर आदी सेवानिवृत्त पोलिस अधिक्षक डॉ आरती सिंह यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ भेटवस्तू व प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात आला यावेळी नाशिक ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी सह कुटंबीय उपस्थित होते यावेळी अधिक्षक डॉ आरती सिंह यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना करत शुभेच्छा दिल्या.