पोस्ट्स

भंडाऱ्यात न्हाली गोदातीर ४६ वर्षांनंतर मऱ्हळच्या खंडोबाची गोदावरीशी भेट

इमेज
करंजी खुर्द येथे महाशिवरात्री उत्सव उत्साहात संपन्न  नाशिक :- श्रीमंत भुषण सिंह राजे होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,यांचे वंशज यांची सोहळ्यास उपस्थिती'यळकोट यळकोट जय मल्हार मार्तंड भैरवाचा' आणि 'सदानंदाचा येळकोट' अशा जयघोषात,प्रतिजेजुरी मऱ्हळ येथील खंडोबा महाराज पालखी तब्बल ४६ वर्षांनंतर गोदावरी नदीच्या भेटीसाठी करंजी खुर्द येथे दाखल झाली. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर झालेल्या या सोहळ्यासाठी करंजी खुर्द येथील ग्रामस्थ आणि तरुण मित्र मंडळांनी स्वयंसेवकांनी गर्दीचे नियोजन,पिण्याचे पाणी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सेवा केली या महाशिवरात्री यात्रोत्सवात भक्ती,परंपरा आणि दातृत्वाचा त्रिवेणी संगम पहावयास मिळाला.पालखी करंजी खुर्द सिन्नर तालुका व निफाड तालुका सरहद्दीवरुन डि.जे लावुन भंडाऱ्याची उधळण करत फट्याक्याची आतिष बाजी करत पालखीचे गोदावरी नदीच्या काठावर आगमन झाले यावेळी देवतांना गोदावरी नदी पात्रात स्नानासाठी विशेष व्यवस्था ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आली होती वाकद शिरवाड्याचे सरपंच डॉ.श्रीकांत आवारे सौ. मनीषा आवारे दाम्पत्याच्या हस्ते पालखीचे विधीवत...

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक येथे २०२५ वर्षात एक हजारांच्या वर यशस्वी ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया

इमेज
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथील ऑर्थोपेडिक विभागाने २०२५ या वर्षात तब्बल १००० यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण करत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.उल्लेखनीय कामगिरीनिमित्त हॉस्पिटलतर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यासर्व शस्त्रक्रिया ऑर्थोपेडिक सर्जन्स डॉ.सागर काकतकर,डॉ.जयेश सोनजे, डॉ.श्रीकांत जाधव आणि डॉ.राहुल सुपे यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ टीमचा मोलाचा वाटा आहे.त्यांच्या कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया,अचूक निदान,रुग्ण-केंद्रित दृष्टिकोन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हा टप्पा गाठणे शक्य झाले आहे.या १००० शस्त्रक्रियांमध्ये गुडघा व खुबा प्रत्यारोपण (Joint Replacement), लिगामेंट पुनर्बांधणी (Ligament Reconstruction), फ्रॅक्चर व्यवस्थापन, आर्थ्रोस्कोपी तसेच इतर जटिल हाड व सांध्यांच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.तसेच,अत्याधुनिक रोबोटिक सर्जरी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काही गुडघा व सांध्यांच्या शस्त्रक्रिया अधिक अचूकतेने पार पाडण्यात आल्या. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेतील नेमकेपणा वाढतो,इम्प्लांटचे अचूक पोझिशनिंग करता ...

राज्यव्यापी भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा नाशिकमध्ये संपन्न

इमेज
नामदेव शिंपी समाजाचा पुढाकार नाशिक :-  नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ,नाशिक यांच्या वतीने आयोजित २१ वा नामदेव शिंपी समाज उत्सव शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समाजबांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. महामार्ग बस स्थानकाजवळील तुपसाखरे लॉन्स येथील कै. श्री. संजीव विष्णुपंत तुपसाखरे सभागृहात हा सोहळा पार पडला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अतुल सुधाकर मानकर (अध्यक्ष, नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ) यांनी उपस्थितांचे स्वागत करत समाजातील ऐक्य आणि संघटनाबळ यावर भर दिला.महिला अध्यक्षा वृषाली संजीव तुपसाखरे,यांनी आपल्या मनोगतातून समाजातील महिलांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे राज्यव्यापी भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा होय. राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने पालक व युवक-युवतींनी सहभाग नोंदवला.या मेळाव्याच्या माध्यमातून सुयोग्य स्थळांची माहिती देवाण-घेवाण होऊन समाजातील वैवा...

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य - विजया रहाटकर

इमेज
‘इंडिया ‘एआय’ इम्पॅक्ट समिट’मध्ये महिला समृद्धीचा निर्धार नवी दिल्ली, दि. १६ :-  आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण,प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे.आगामी काळात ‘एआय’मुळे रोजगाराच्या संधी आणि स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलणार असून महिलांनी  या तंत्राच्या केवळ ‘वापरकर्त्या’ म्हणून न राहता संशोधक आणि  निर्माते होऊन नव्या परिवर्तनाचे नेतृत्व करावे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास होउ शकेल असा आशावाद राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज येथे व्यक्त केला.दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये  दुपारी राष्ट्रीय महिला आयोग, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आणि संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण व संशोधन संस्था (युनिटार) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘एआय’ आणि आर्थिक शक्ती – महिला नेतृत्वातील समृद्धीची रूपरेषा या  विषयावर आयोजित विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समारोपीय भाषणात त्या बोलत होत्या...

अन्न व औषध प्रशासन विभागातील लाच प्रकरणाची गंभीर दखल - मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आदेश

इमेज
मुंबई, दि. १५ :- अन्न व औषध प्रशासन विभागामधील लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लाच घेताना पकडलेल्या लिपिकाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.संबंधित लिपिकाची केवळ चौकशीच नव्हे,तर त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.विभागातील दक्षता पथकाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. लिपिक राजू ढेरिंगे याच्याविरुद्ध वस्तुनिष्ठ आणि सर्वंकष अहवाल तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले आहे.राजू ढेरिंगे हे मूळ अन्न व नागरी पुरवठा विभाग येथील कर्मचारी असून सध्या अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते.

मुलुंड मेट्रो दुर्घटना प्रकरणी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित

इमेज
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कारवाई मुंबई,दि.१४: मेट्रो लाईन४ श(वडाळा-कासारवडवली) मार्गावर मुलुंड येथे झालेल्या दुर्घटने प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे,यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत.अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतानाच जखमींच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीए करणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.एमएमआरडीए प्रशासनाकडून दुर्घटनेची माहिती घेतानाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सार्वजनिक सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही,असा इशारा दिला.या दुर्घटनेची दखल घेत त्यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांचे निलंबनाचे निर्देश दिले.

णमोकार तीर्थ हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर ते मानवतेला दिशा देणारे आध्यात्मिक विद्यापीठ - मंत्री छगन भुजबळ

इमेज
णमोकार तीर्थ आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा एवं महास्तकाभिषेक महोत्सवास मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती णमोकार तीर्थ हे केवळ मंदिर न राहता ते विश्वशांतीचा संदेश देणारे केंद्र बनेल - मंत्री छगन भुजबळ जगाच्या तणावाच्या परिस्थितीत शांतता निर्माण करण्यासाठी जैन समाजाचा अहिंसेचा विचार अधिक महत्वाचा - मंत्री छगन भुजबळ (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक,चांदवड  :- णमोकार तीर्थ हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ते मानवतेला दिशा देणारे आध्यात्मिक विद्यापीठ आहे.जैन धर्माने जगाला अहिंसा, सत्य,करुणा आणि संयम यांचा संदेश दिला आहे. आजच्या अस्थिर आणि तणावपूर्ण वातावरणात हा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. आजच्या या जगाच्या तणावाच्या परिस्थितीत जगात अहिंसा निर्माण होण्यासाठी जैन समाजाचे योगदान अतिशय महत्त्वाचे राहील असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.णमोकार तीर्थ,आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा एवं महास्तकाभिषेक महोत्सव, मालसाने,ता.चांदवड, जि.नाशिक येथे आज मोक्षकल्याण, विश्वशांती महायज्ञ आणि समारोप सोहळा पार पडला.सोहळ्यास रा...