पोस्ट्स

नाशिकच्या हॉटेल ट्रीट येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी शिवसेना युतीची नेत्यांकडून घोषणा

इमेज
*इलेक्टिव मेरिट हा फॉर्म्युला ठेऊन नाशिक महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी व शिवसेनेची युती* नाशिक,दि.२९ डिसेंबर :- इलेक्टिव मेरिट हा फॉर्म्युला ठेऊन नाशिक महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी व शिवसेनेची युती करण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व शिवसेनेच्या वतीने नाशिकमध्ये करण्यात आली.नाशिकच्या हॉटेल ट्रीट येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.राष्ट्रवादी व शिवसना युतीच्या वतीने मंत्री नरहरी झिरवाळ यांनी युतीची घोषणा केली.यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ,माजी खासदार समीर भुजबळ,माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर,शिवसेनेचे विजय करंजकर,सुर्यकांत लवटे,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे,शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पार्टीचे स्टार प्रचारक तथा माजी खासदार समीर भुजबळ, शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे,आमदार हिरामण खोसकर,विजय करंजकर यांनी य...

मतदार जनजागृती अभियानांतर्गत ५१०० नाशिक महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

इमेज
नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६  नाशिक :- नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदार जनजागृती अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनिषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणासाठी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मतदान जनजागृती व निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेची शपथ देण्यात आली.या वेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडण्याची सामूहिक शपथ घेतली.सदर शपथेचे वाचन नाशिक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले.आज मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या केंद्राध्यक्ष,तसेच अधिकारी क्रमांक १, २ व ३ यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन दादासाहेब गायकवाड सभागृह, कालिदास कला मंदिर व पंचवटी येथील सदाशिव भोरे नाट्यगृह येथे करण्यात आले होते.या प्रशिक्षण सत्रांमध्ये सकाळ व दुपार सत्रात सह जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ व अभिजीत नाईक,यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ...

श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शन बंद प्रशासनाचा निर्णय

इमेज
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिन्याकरिता बंद भाविकांनी सहकार्य करण्याचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन  पुणे, दि.२७ :- श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकाम तसेच भाविकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासोबतच कामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करण्याच्यादृष्टीने मंदिर ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी महाशिवरात्रीचा कालावधी वगळून भाविकांना दर्शनाकरिता बंद करण्याचा निर्णय श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थानने घेतला आहे, भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूड्डी यांनी केले आहे.राज्य शासनाने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखडा मंजुर केला आहे. या आराखड्यातील अत्यंत महत्वाच्या टप्प्याची अंमलबजावणी तसेच प्रत्यक्ष बांधकामाच्या काळातील सुरक्षितता लक्षात घेता २३ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन,श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त,स्थानिक दुकानदार व श्री.भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठकीत सर्वाच्या सहमतीने मंदिर ...

शिवगोरक्ष योगपीठ आयुर्वेद संस्थानात मोफत साथरोग संधीवात औषध उपचार शिबिर नाव नोंदणी करुन लाभ घेण्याचे आवाहन

इमेज
नाशिक :- पंचवटीतील अमृतधाम परिसरातील शिवगोरक्ष योगपिठातर्फे शनिवारी (दि. ३ जानेवारी) मोफत संधीवात व साथीच्या आजाराबाबत आरोग्य शिबीर होणार आहे. या शिबिरात रुग्णांना मोफत औषधे देण्यात येणार आहे.शिवगोरक्ष योगपिठात होणाऱ्या या शिबिरात संधीवात आजारावर मोफत उपचार व औषधे देण्यात येतील.यासह साथीच्या आजाराबाबत (सर्दी, खोकला) मोफत तपासणी व औषधे देण्यात येणार आहे.या शिबिरात मुंबईच्या जोविस हॉस्पिटलचे डॉ.राज सातपुते, डॉ.ज्योती सातपुते,डॉ.संगीता जाधव,डॉ.प्रविण बुरम यांच्यासह त्वचारोग तज्ज्ञ कंचन सुथार, तेत्रतज्ज्ञ डॉ. उदय साकुरीकर यांच्यासह डॉ. प्रज्ञा देशमुख, डॉ. वर्षा देशमुख,डॉ.भारती चव्हाण, डॉ. भालचंद्र ठाकरे रुग्णांवर उपचार करणार आहे.यासह डॉ.प्रसाद अकोलकर,हे पंचकर्मबाबत दुपारी १२ ते १ पर्यंत सविस्तर माहिती देणार आहे.याचबरोबर निरामय क्लिनिकच्या माध्यमातून हिमोग्लोबिन तपासणी शिबीर यशस्वी होण्यासाठी शिवगोरक्ष योगपिठाचे भगवान महाराज ठाकरे,शिवानंद महाराज, मच्छिंद्र साठे,ज्ञानेश्वर गोसावी,राजेंद्र मोगल, विकास निचित,सुरेश तावडे, दिलीप शेळके, गणपत शेळके यांच्यासह आश्रमाचे साधक परिवार परिश्र...

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच एअरलिफ्टेड लिव्हर ट्रान्सप्लांट आणि ७ दिवसात रुग्णाला डिस्चार्ज

इमेज
40 दिवसात तीन यशस्वी लिव्हर ट्रान्सप्लांट अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचा नवा विक्रम (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- उत्तर महाराष्ट्रात प्रथमच एअरलिफ्टेड लिव्हर ट्रान्सप्लांट आणि ७ दिवसात रुग्णाला डिस्चार्ज उत्तर महाराष्ट्रात प्रथमच,अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथे मानवी यकृताची हवाई मार्गाने यशस्वी वाहतूक करून यकृत प्रत्यारोपण करण्यात आले.वेळेवर नियोजन आणि अचूक समन्वयामुळे ही ऐतिहासिक कामगिरी शक्य झाली.सांगली ते कोल्हापूर दरम्यान ग्रीन कॉरिडॉर,तर कोल्हापूर ते नाशिक कार्गो एअर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून अवघ्या दोन तासांत यकृताची सुरक्षित व जलद वाहतूक करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेमुळे एका गंभीर रुग्णाच्या जीवनात नव्याने आशेचा किरण निर्माण झाला.अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. संदीप पाटील यांच्या देखरेखीखाली उपचार घेत असलेल्या, यकृत सिरोसिस व यकृताच्या कर्करोगाने त्रस्त दोंडाईचा, जि. धुळे, येथील ५१ वर्षीय पुरुष रुग्णावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. वेळेत करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला नवीन जीवन मिळाले असून अवघ्या सा...

मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी कृतीतून संकल्प करूया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

इमेज
वीर बाल दिवसानिमित्त साहिबजाद्यांच्या शौर्याला नमन मुंबई, दि. २६ :-शीख पंथीयांचे दहावे गुरू श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे) आणि साहिबजादे बाबा फतेह सिंग (वय ७ वर्षे) यांच्या अद्वितीय शौर्य व बलिदानाच्या स्मरणार्थ २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून पाळला जातो. वीर बाल दिवसाच्या निमित्ताने गुरूंनी दाखविलेल्या मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात अंगीकारण्यासाठी आपण स्वतःला कृतीतून संकल्पित केले पाहिजे.साहिबजाद्यांच्या धैर्याने आणि बलिदानाने भारतीय इतिहासाला नवी दिशा दिली असून,त्यांचे शौर्य सदैव पिढ्यान्‌पिढ्यांना प्रेरणा देत राहील,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.सायन येथील गुरूद्वारा गुरू तेग बहादूर दरबार येथे वीर बाल दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर शहीद साहिबजादे यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या अद्वितीय शौर्याचे स्मरण केले.यावेळी गुरूद्वारा समितीच्या सदस्यांनी किर्तन,कविता वाचन केले आणि वीर शहीद साहिबजादे ...

प्रचार समाप्तीनंतर सर्व प्रसारमाध्यमांतील निवडणूकविषयक जाहिरातींना बंदी - राज्य निवडणूक आयुक्त

इमेज
मुंबई,दि.२४ :- महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची मुदत 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता संपणार असल्याने,त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांसह अन्य कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वरे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत,अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे,यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते.आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.वाघमारे यांनी सांगितले की,महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे.संबंधित अधिनियमातील तरतुदींनुसार मतदान समाप्तीच्या 48 तास आधी म्हणजे 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपेल. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून कुठल्याही प्रकारची जाहिरात प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाही. त्यामुळे जाहीर प्रचाराच्या समाप्त...