शिवगोरक्ष योगपीठ आयुर्वेद संस्थानात मोफत साथरोग संधीवात औषध उपचार शिबिर नाव नोंदणी करुन लाभ घेण्याचे आवाहन
नाशिक :- पंचवटीतील अमृतधाम परिसरातील शिवगोरक्ष योगपिठातर्फे शनिवारी (दि. ३ जानेवारी) मोफत संधीवात व साथीच्या आजाराबाबत आरोग्य शिबीर होणार आहे. या शिबिरात रुग्णांना मोफत औषधे देण्यात येणार आहे.शिवगोरक्ष योगपिठात होणाऱ्या या शिबिरात संधीवात आजारावर मोफत उपचार व औषधे देण्यात येतील.यासह साथीच्या आजाराबाबत (सर्दी, खोकला) मोफत तपासणी व औषधे देण्यात येणार आहे.या शिबिरात मुंबईच्या जोविस हॉस्पिटलचे डॉ.राज सातपुते, डॉ.ज्योती सातपुते,डॉ.संगीता जाधव,डॉ.प्रविण बुरम यांच्यासह त्वचारोग तज्ज्ञ कंचन सुथार, तेत्रतज्ज्ञ डॉ. उदय साकुरीकर यांच्यासह डॉ. प्रज्ञा देशमुख, डॉ. वर्षा देशमुख,डॉ.भारती चव्हाण, डॉ. भालचंद्र ठाकरे रुग्णांवर उपचार करणार आहे.यासह डॉ.प्रसाद अकोलकर,हे पंचकर्मबाबत दुपारी १२ ते १ पर्यंत सविस्तर माहिती देणार आहे.याचबरोबर निरामय क्लिनिकच्या माध्यमातून हिमोग्लोबिन तपासणी शिबीर यशस्वी होण्यासाठी शिवगोरक्ष योगपिठाचे भगवान महाराज ठाकरे,शिवानंद महाराज, मच्छिंद्र साठे,ज्ञानेश्वर गोसावी,राजेंद्र मोगल, विकास निचित,सुरेश तावडे, दिलीप शेळके, गणपत शेळके यांच्यासह आश्रमाचे साधक परिवार परिश्रम घेत आहेत.अधिक माहिती नाव नोंदणीसाठी संपर्क - 88888 32294
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा