ब्राह्मणगाव येथे सर्व रोग निदान आरोग्य शिबीर संपन्न
बागलाण :- तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्था म ,आ , वि वि नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे,यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ हर्षल कुमार महाजन तालुका आरोग्य अधिकारी,यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सुरुवातीला शिबीराचे उद्घाटन प्रतिमा पुजन ब्राम्हणगाव सरपंच किरण अहिरे, उपसरपंच बापुराज खरे,यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी अस्थिरोग तज्ञ,औषध उपचार,नाक कान घसा, नेत्रतज्ज्ञ आदिंसह आजारांवरील तज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेऊन गरजु लाभार्थी यांचा शिबीरात इलाज व मार्गदर्शन केले.यावेळी शिबीर यशस्वीतेसाठी ब्राम्हणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ अभिजीत गायकवाड,डॉ कुष्णा माने,डॉ देशमुख,डॉ खैरनार,डॉ वळवी,डॉ सांगळे, डॉ गायकवाड, यांच्यासह आरोग्य सहाय्यक खरे नाना,हिरे नाना, वाघ मॅडम,प्रयोगशाळा तंत्रज्ञ बागुल मडम,औषधे निर्माण अधिकारी पावरा तात्या,व सर्व आरोग्य सेवक,सेविका,गटप्रवर्वतक,आशाताईं ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा