सिंहस्थ कुंभमेळा तयारीसाठी ₹२०० कोटी एनएमसी क्लीन गोदावरी बॉण्ड्स मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यशस्वी लिस्टिंग


मुंबई :- नाशिक महानगरपालिका ‘सिंहस्थ कुंभमेळा २०२७’ तयारीसाठी ₹२०० कोटी उभारण्यासाठी ‘एनएमसी क्लीन गोदावरी बॉण्ड्स’चे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशस्वी लिस्टिंग.नाशिक महानगरपालिकेने (NMC) आपल्या पहिल्या महानगरपालिकेच्या बॉण्ड इश्यूअन्सअंतर्गत ‘एनएमसी क्लीन गोदावरी बॉण्ड्स’ या ₹२०० कोटींच्या बॉण्डचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) वर लिस्टिंग केले असून, नाशिक महानगरपालिका ही महाराष्ट्रातील तिसरी मनपा ठरली असून पायाभूत सुविधासाठी बॉण्ड द्वारे वित्त पुरवठा करणे हे महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. मुंबई येथील NSE मध्ये झालेल्या लिस्टिंग सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, NSE चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्यकार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान,मित्राचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी,
नगर विकास विभागाचे अप्पर मुख्यसचिव डॉ. डी.एच.गोविंदराज,उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव नविन सोना,ए के कॅपिटलचे मुख्यकार्यकारी अधिकारी अतुलकुमार मित्तल,नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष डॉ.प्रविण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह,मनपा आयुक्त मनिषा खत्री,नाशिक मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटीयार,अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर व महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी,अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,मुख्यलेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरुट,मुख्यलेखा परीक्षक बळवंत गायकवाड,उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, अजित निकत,शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत,रविंद्र धारणकार,NSE अधिकारी,व नाशिक मनापास बॉण्ड उभारणी करिता तांत्रिक सहाय्य करणारे विविध संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.
बॉण्ड लिस्टिंग सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे स्वागत मनपा आयुक्त मनिषा खत्री,यांनी स्वागत करून या बॉण्ड विषयी सविस्तर माहिती दिली इश्यूमध्ये ₹१०० कोटींचा बेस इश्यू होता.याला संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ३.९५ पट जास्त प्रतिसाद मिळत उत्तम सब्स्क्रिप्शन प्राप्त झाले, ज्यातून नाशिक महानगरपालिका बॉण्ड्सवरील गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास दिसून आला आहे.या इश्यूद्वारे उभारलेला निधी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर पुढील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी वापरला जाणार आहे:
1)रामझुला पादचारी पुलाचे बांधकाम
2)काळाराम मंदिर परिसरात वेंडिंग प्लाझा आणि मूलभूत विकास कामे
3)कापलेश्वर मंदिराजवळ प्रस्तावित मुलभूत सोयी सुविधा उभारणे
4)पंचवटी, सातपूर व नाशिक पश्चिम क्षेत्रातील मलनि:सारण प्रकल्प नेटवर्क सुधारणा
या विकासकामांसाठी हा निधी वापरला जाणार आहे नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त व प्रशासक मनिषा खत्री म्हणाल्या,“₹२०० कोटींचे हे बॉण्ड लिस्टिंग नाशिकच्या विकास प्रवासातील एक नवे पर्व आहे.रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा,पारदर्शकता आणि निश्चित वेळेत काम पूर्ण करण्याची आमची वचनबद्धता याचा हा प्रत्यय आहे.”अशी माहिती मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी बॉण्ड लिस्टिंग सोहळ्यात प्रास्तविक सादर करताना दिली.
NSE चे MD व CEO आशिषकुमार चौहान म्हणाले,“ही ऐतिहासिक कामगिरी साधल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री,व मनपाच्या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ३.९५ पट मिळालेला प्रतिसाद हे महानगरपालिका बॉण्ड्सवरील गुंतवणूकदारांच्या वाढत्या विश्वासाचे प्रतीक आहे.शहरी पायाभूत सुविधा विकासासाठी पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने स्थानिक संस्थांना भांडवल उभारण्यासाठी NSE चा पाठिंबा कायम राहील.” व या बॉण्ड लिस्टिंग करीता शासनाच्या व नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या विविध तपासणी प्रक्रियेत नाशिक मनपाने अतिशय जलदगतीने कामकाज केल्याने केवळ ४ महिन्यातच बॉण्ड लिस्टिंग होण्याचा मान नाशिक महानगरपालिकेस मिळाला आहे,हे देखील अभिमानास्पद बाब असल्याचे आपल्या भाषणात नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले—“नाशिक महानगरपालिकेच्या ₹२०० कोटींच्या बॉण्डचे NSE वरील हे यशस्वी लिस्टिंग,हे केवळ नाशिकसाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या अभिमानाचा क्षण आहे.येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जागतिक दर्जाचे पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत राज्य सरकारची बांधिलकी या उपक्रमातून दिसून येते.कुंभमेळा हे फक्त आयोजन नसून आपल्या श्रद्धेचा,परंपरेचा व सांस्कृतिक वारशाचा गौरव आहे.‘विकसित भारत’या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेप्रमाणे - विकासाचा वारसाची जपणूक म्हणून नाशिक आज नव्या शहरनिर्मितीचा आदर्श ठेवत आहे.या करिता मनपाच्या अर्थिक स्थिती चे अवलोकन होऊन अतिशय कमी वेळेत बॉण्ड लिस्टिंगची सर्व कारवाई पूर्ण केल्याने नाशिक मनपाच्या आयुक्त खत्री व सर्व मनपाच्या अधिकारी वर्गाचे अभिनंदन केले.सदर बॉण्ड उभारणीमुळे नाशिक मनापास केंदशासनामार्फत २६ कोटी रुपये प्रोत्साहनपर अनुदान तसेच ucf (अर्बन चॅलेंज फँड) द्वारे अर्थ सहाय्य इत्यादी बाबी लक्षात घेता इफेकटिव्ह व्याज दर हा बिनव्याज कर्ज स्वरूपात निधी उभारणी होणार आहे,असेही मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात नमूद केले.या सोहळ्यात तांत्रिक सहकार्य करणारे ए के कॅपिटल मर्चंट बँकर,नॅशनल स्टॉक एक्सचेंज, विधी सल्लागार,लेखापरीक्षण,मनपा आयुक्त व सर्व विभाग प्रमुखांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,यांच्या हस्ते करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी