नाशिक महापालिकेत भाजपच्या शंभर पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा निर्धार - निवडणूक प्रमुख आ.देवयानी फरांदे
नाशिक :- भाजप कार्यालय वसंतसृती येथे महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार,आमदार सीमाताई हिरे, मा.आ.बाळासाहेब सानप,विजय साने,लक्ष्मण सावजी,सुधारक बडगुजर,सुजाता करजगीकर,प्रशांत जाधव,नाना शिलेदार,तसेच सर्व ज्येष्ठ नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांनी नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल आ. देवयानी फरांदे,यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी फरांदे यांनी सर्वांशी संवाद साधत.येणाऱ्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत १०० पेक्षा अधिक जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आणण्याचे लक्ष्य असल्याचे नमूद केले,आणि ते साध्य करण्यासाठी संघटनेतील प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल,असा विश्वास व्यक्त केला.महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार,आमदार राहुल ढिकले,आमदार सीमाताई हिरे,मा.आ बाळासाहेब सानप,जेष्ठ नेते विजय साने,लक्ष्मण सावजी,मा.नगरसेवक सुधारक बडगुजर,सुजाता करजगीकर, प्रशांत जाधव,नाना शिलेदार,व इतर सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने ही निवडणूक यशस्वीरीत्या पार पाडण्याचा ठाम विश्वास निवडणूक प्रमुख आ.देवयानी फरांदे यांनी यावेळी व्यक्त केला. वरिष्ठांचा विश्वास,कार्यकर्त्यांची ऊर्जा आणि जनतेचा पाठिंबा याच्या बळावर नाशिक महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्याचा निर्धारही आमदार फरांदे यांनी केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा