लाखोंच्या विदेशी मद्यासह एक इसम नाशिक ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात
पेठ- नाशिक रोडवर कोटंबी घाटात अवैध दारुची वाहतुक करणारे इसमास २८,५५,४४० रुपयाचे मुददेमालासह घेतले ताब्यात विशेष पथकाची कारवाई) (प्रतिनीधी समाधान शिरसाठ) पेठ :- आज दिनांक ११/१२/२०२५ रोजी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली होती की, दमण दिव येथे तयार होणारी परंतु महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेली दमण निर्मीत विदेशी दारु आयशर क्रमांक एमएच-०४-एलई-६९७४ मध्ये भरुन पेठ मार्गे नाशिक बाजुकडे येत आहे.याबाबत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,यांनी पुढील कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक रविन्द्र मगर,यांचे मार्गदर्शनाखाली पथक क्रं. ४ चे पोलीस उप निरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोहवा/११०१ कैलास रामदास बागुल, पोकॉ/१६३६ किरण रामदास आहेर, पोकों/२६९२ श्रीराम दत्तात्रय वारुंगसे, हे कारवाई कामी नाशिक येथुन पेठकडे खाजगी वाहनाने रेड कामी लागणारे साहित्य साधने घेवुन रवाना झाले.नाशिक पेठ मार्गे कोटंबी घाटाचे सुरुवातीस पथक थांबत तेथे पोलीस उप निरीक्षक प्रकाश चव्हाणके,यांच्यासह पंचनाम्यातील दोन पंचांना समक्ष घटनास्थळी बोलावुन घेवुन त्यांना देखील वरील सर्व बातमी समजावुन सांगितल...