येवल्यातील व्यापारी गटाचे भरत समदडीया व हमाल मापारी गटाचे अर्जुन ढमाले यांचा छगन भुजबळ यांच्या शेतकरी विकास पॅनला पाठींबा

व्यापारी गटाचे भरत समदडीया व हमाल मापारी गटाचे अर्जुन ढमाले यांच्याकडून छगन भुजबळ यांच्याकडे पाठींबा पत्र सुपूर्त नाशिक:-(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी उपमुख्यमंत्री येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत अपक्ष निवडून आलेले व्यापारी गटाचे उमेदवार भरत समदडीया व हमाल मापारी गटाचे उमेदवार अर्जुन ढमाले यांनी आज छगन भुजबळ यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेऊन छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलला पाठींबा देत असल्याचे पत्र दिले. यावेळी छगन भुजबळ यांनी दोनही उमेदवारांचे स्वागत करून त्यांना पुष्पगुच्छ देत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी दिलेल्या संमती पत्रात म्हटले आहे की, आम्ही येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेलो आहोत. भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने मोठ यश संपादन केल आहे. येवल्याच्या विकासाठी छगन भुजबळ यांचे योगदान अतिशय महत्वाचे असून कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आ...