राज्यव्यापी भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा नाशिकमध्ये संपन्न
नामदेव शिंपी समाजाचा पुढाकार नाशिक :- नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ,नाशिक यांच्या वतीने आयोजित २१ वा नामदेव शिंपी समाज उत्सव शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समाजबांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. महामार्ग बस स्थानकाजवळील तुपसाखरे लॉन्स येथील कै. श्री. संजीव विष्णुपंत तुपसाखरे सभागृहात हा सोहळा पार पडला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अतुल सुधाकर मानकर (अध्यक्ष, नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ) यांनी उपस्थितांचे स्वागत करत समाजातील ऐक्य आणि संघटनाबळ यावर भर दिला.महिला अध्यक्षा वृषाली संजीव तुपसाखरे,यांनी आपल्या मनोगतातून समाजातील महिलांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे राज्यव्यापी भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा होय. राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने पालक व युवक-युवतींनी सहभाग नोंदवला.या मेळाव्याच्या माध्यमातून सुयोग्य स्थळांची माहिती देवाण-घेवाण होऊन समाजातील वैवा...